डॉ. मुकेश बत्रा यांनी मुंबईकरांना केले मंत्रमुग्ध
आपल्या हळुवार स्पर्शाने होमियोपथी उपचार करण्यात आद्य भूमिका बजावून भारतासह जगभरातील अनेक लोकांना बरे करणारे डॉ. बत्राज पॉझिटीव्ह हेल्थ क्लिनिकचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी वाय. बी. चव्हाण सभागृहामध्ये रंगलेल्या यादों की बहार ५’ या संगीत संध्येमध्ये गतकाळातील बॉलीवूडची सुपरहिट गाणी सादर करत आपल्या मधाळ आवाजाने मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला मंदिरा बेदी, वर्षा उसगावकर, मालती जैन, अक्षय बत्रा आदी मान्यवर मंडळीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शेफर्ड संस्थेच्या विधवा महिलादेखील उपस्थित होत्या.आपली संगीताची आवड जपत डॉ. मुकेश बत्रा सादर करत असलेल्या ‘यादों की बहार’ या संगीत संध्येचे हे पाचवे वर्ष असून नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे डॉ. बत्रा या कार्यक्रमाद्वारे जमा होणारी रक्कम विधवा महिलांना मोफत निवारा, वैद्यकीय आणि इतर सुविधा पुरविणारी संस्था शेफर्डसला देणगी स्वरूपात देतात.
गेल्या ३० वर्षांपासून डॉ. बत्रा या संस्थेशी जोडलेले असून ते या संस्थेतील स्त्रियांवर मोफत उपचार देखील करतात. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवत डॉ. बत्रा यांनी सादर केलेल्या गाण्यांना टाळ्या वाजवून पसंतीची मोहर उमटवली.
यादों की बहार या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलताना डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, ‘आयुष्यात भरपूर काही गमावल्यामुळे या स्त्रियांना उर्वरित जीवन एकांतात, दुःखात आणि अडचणींमध्ये घालवावे लागणार नाही याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या स्त्रियांना आपली सहानुभूतीची गरज नसून आपल्या प्रेमाची व काळजीची अधिक आवश्यकता आहे. हा कार्यक्रम त्यांना किंवा त्यांच्या सेवाभावी संस्थेला केवळ देणगी देण्यासाठी नसून त्यांच्या जिद्दीला पुरस्कार देण्यासाठी आहे.’
भारतातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी विधवा महिलांना मदत करण्याच्या हेतूने ‘यादों की बहार ५’ या संगीत संध्येचे आयोजन वाय. बी. चव्हाण सेंटर येथे केले होते. यावेळी डॉ. बत्रा यांनी गतकाळातील बॉलीवूडची सुपरहिट गाणी सादर करत मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला अभिनेत्री मंदिरा बेदी, वर्षा उसगांवकर, मालती जैन, डॉ. अक्षय बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.