पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरीत सामूहिक कलाप्रदर्शन
‘मिरॅकल्स’ या शीर्षकांतर्गत २६ समकालीन चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या विविध कलारूपांचे प्रदर्शन प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर येथील पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २६ जानेवारी पासून सुरू झाले असून, ते रसिकांना दि. ३१ जानेवारीपर्यंत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पहाता येईल. सदर कलाप्रदर्शनात देशातील विविध भागातील २६ चित्रकारांचा सहभाग असून त्याद्वारे सर्वांना अनेक सांस्कृतिक विशेषांचे व अभिव्यक्तित्वांचे एक आगळे वेगळे दर्शन घडणार आहे. मूर्त, अमूर्त व व्यक्तिरूपात्मक तसेच सृजनशील अशा अनेक शैलीत तेलरंग, जलरंग, अक्रीलिक, मिक्स मिडियम, सिर्यामिक वगैरेचा वापर करून कलाकारांनी या प्रदर्शनात मांडलेली चित्रे मनोवेधक व आकर्षक आहेत. हे प्रदर्शन गुरुप्रिओ पॉल यांनी जयगुरु आर्टस या संस्थेअंतर्गत आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात पृथ्वी सोनी, प्रकाश भेंडे, भगवान रामपुरे, जे. एस. मुन्नोली, अलका भ्रूशुंडी, दीपिका त्रिवेदी, आनंद तोरसकर, अंजली अगरवाल, अनुपमा पाटील, दीपिका मिश्रा, अनुपा देसाई, अपर्णा लाड, आकाश सोनी, बंसारी चावडा, दीपक विनोद प्रकाश गुप्ता, डॉ. वैशाली दास, धीरज पाटील, कविता सोनी, मीना राघवन, प्रवीण झाला, राधिका गोवर्धन, रागिनी सिनकर, रेणु भट्ट, सीमा मोरे, सुधा मोहन, शशिकांत चारबे या प्रथितयश चित्रकारांचा समावेश असून रसिकांना त्यांच्या चित्रकृतींचा आनंद घेता येणार आहे.