‘दाभोळकरचं भूत’ने उघडणार अंतिम फेरीचा पडदा!
हौशी रंगकर्मीना हक्काचा रंगमंच उपलब्ध करून देणारी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची राज्य नाटय़ स्पर्धा सोमवार, दि.१६ फेब्रुवारीपासून पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात सायंकाळी ७ वाजतापासून सुरू होत आहे.
१६ फेब्रुवारी ते १३ मार्चर्पयत ही स्पर्धा चालणार चालणार असून, राज्यातील १९ आणि गोव्याचे दोन अशा एकूण २१ नाटकांचे सादरीकरण या स्पध्रेत होणार आहे. या स्पर्धेला ५४ वर्षाचा समृद्ध वारसा आहे.
राज्यभरात वेगवेगळ्या केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत सुमारे २७५ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या २१ नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. रायगड जिल्हय़ातील पनवेलमध्ये नव्यानेच बांधण्यात आलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात ही स्पर्धा रंगणार असून, पनवेलकरांना पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी बघण्याची संधी मिळाली आहे.बहुतांश नाटकांचे प्रयोग सायंकाळी सात वाजता होणार असून, ३ प्रयोग सकाळी ११.३० वाजता होणार आहेत. अनेक नवे विषय, नव्या संहिता, जुन्या गाजलेल्या दर्जेदार नाटकांचा वेगळा आविष्कार, महाविद्यालयीन रंगभूमीवरून आलेले युवा रंगकर्मी, तसेच प्रायोगिक रंगभूमीवरील महत्वाच्या रंगकर्मीचे स्पध्रेत सहभागी असणो हे यंदाच्या स्पध्रेचे ठळक वैशिष्टय़ आहे.

अंतिम फेरीत संस्थेच्या आद्याक्षरानुसार प्रयोग सादर करावा लागणार आहेत. ‘ए टू ङोड’ या क्रमानुसार अंतिम फेरीत अध्ययन भारती, वर्धा या संस्थेचे श्याम पेठकर लिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित ‘दाभोळकरचं भूत’ या नाटकाने या स्पर्धेची सुरुवात सोमवारी होणार आहे.
कलावंतांची निवासव्यवस्था ‘रेखी’मध्ये
कलावंतांची निवासव्यवस्था ‘रेखी’मध्ये
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने स्पर्धक संघातील कलावंतांची प्रयोगाच्या दिवशीची निवास व्यवस्था नाटय़गृहानजीक असलेल्या शिवाजी रोडवरील रेखी कॉम्प्लेक्समधील रेखी हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे समन्वयक समीर पेणकर असून, स्पर्धक संघांनी अधिक माहितीसाठी त्यांच्या ९१६७१९१९८६ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.