२०१५चे नामांकने जाहीर
प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी मराठी सिने-नाट्य कलावंतांसाठी उत्सुकता वाढली!
मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील कलावंतांसाठी प्रतिष्ठेचे समजले जाणा-या ‘झी गौरव पुरस्कारां’ची नामांकने जाहीर झाली असून, चित्रपटासाठी एलिझाबेथ एकादशी, हॅपी जर्नी, लय भारी, लोकमान्य एक युगपुरूष आणि पोश्टर बॉईज यांच्यातून कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.
व्यावसायिक नाटकांमध्ये विशेषलक्षवेधीनाट्यकृती म्हणून ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाला पुरस्कार जाहीर झाला असून,उत्कृष्टनाटकाच्या पुरस्कारासाठी गोष्ट तशी गमतीची, कळत नकळत, त्या तिघांची गोष्ट, बेगम मेमरी आठवणगुलाम आणि सर्कीट हाऊस या नाटकांमध्ये चुरस आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये विशेष लक्षवेधी नाट्यनिर्मिती पुरस्कार ‘गोष्ट सिंपल पिलाची’ या नाटकासाठी जाहीर झाला आहे. उत्कृष्ट नाटकांसाठी एक बाकी एकाकी, झोपाळा, तीचे संदर्भ नसलेली गोष्ट, आयदान, ती या कलाकृतींना नामांकने जाहीर करण्यात आली.
यावर्षी रंगणार चित्रगौरव आणि नाट्यगौरव असे दोन पुरस्कार सोहळे
यावर्षी रंगणा-या झी गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी चित्रपटासाठी ‘चित्रगौरव’ आणि नाटकांसाठी ‘नाट्यगौरव’ असे दोन वेगवेगळे रगंतदार सोहळे होणार आहेत. यातील ‘चित्रगौरव’ येत्या १३ मार्चला तर ‘नाट्यगौरव’ २६ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
वर्षभरात प्रदर्शित होणारे अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट आणि दर्जेदार नाटकांचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा. या कलाकृतींबरोबरच ती घडण्यामागे हातभार लागलेल्या अनेक महत्त्वांच्या विभागांची, कलाकारांची आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीची कार्याची दखल घेणारा पुरस्कार सोहळा अशी झी गौरवची ओळख आहे. आपल्या दशकभराहून अधिकच्या प्रवासात झी गौरव पुरस्काराने चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये विश्वासाचं आणि मानाचं स्थान मिळवलं आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाचा समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये यावर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ने १३ नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे तर यंदा ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या ‘लय भारी’ने तब्बल १२ विभागात नामांकने मिळवली. याशिवाय ‘लोकमान्य-एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘क्लासमेट्स’नेही महत्त्वाच्या विभागांमध्ये नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित भरत जाधव अभिनित ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाला सर्वात जास्त ९ नामांकने मिळाली असून संजय खापरे अभिनित ‘कळत नकळत’ या नाटकाने ८ नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘ती’, ‘गोष्ट सिंपल पिलाची’ आणि ‘झोपाळा’ या नाटकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.
या नामांकानामधून विजेते कोण ठरतो याची उत्सुकता वाढली आहे. झी गौरव पुरस्कारासाठी कलावंतांना नामांकन मिळणे, हा सुद्धा गौरवच समाजला जातो. त्या नामांकन मिळवलेल्या गौरवार्थींची नावे खालील प्रमाणे आहेत.
चित्रपट विभाग
नामांकने
१) उत्कृष्ट पोशाख
चैत्राली डोंगरे- एलिझाबेथ एकादशी
महेश शेरला- लोकमान्य एक य़ुगपुरूष
पौर्णिमा ओक- रमा माधव
पौर्णिमा ओक- तिचा उंबरठा
गीता गोडबोले- विटी दांडू
२) उत्कृष्ट मेकअप
अतुल सिधये- क्लासमेट्स
विक्रम गायकवाड- लोकमान्य एक युगपुरूष
विनय सुर्यवंशी – रमा माधव
माल्कम फर्नांडिस- शटर
जगदीशयेरे (संकल्पना- विक्रम गायकवाड) – विटी दांडू
३) उत्कृष्ट कलादिग्दर्शन
देवदास भंडारी – तप्तपदी
सचिन भिलारे- एलिझाबेथ एकादशी
प्रशांत बिडकर- किल्ला
संतोष फुटाणे- लोकमान्य एक युगपुरूष
महेश कुडाळकर- विटी दांडू
४) उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
गणेश आचार्य – “आला होळीचा सण”- लय भारी
उमेश जाधव – “यहां वहां सारा जहां”- प्यारवाली लव्हस्टोरी
उमेश जाधव – “आली लहर केला कहर”- प्यारवाली लव्हस्टोरी
अक्षता तिखे – “हमाम्मा रे पोरा हमाम्मा” – रमा माधव
जावेद सनादी – “झंपक झंपक झंपक” – मामाच्या गावाला जाऊया
५) उत्कृष्ट संकलन
इम्रान-फैजल- क्लासमेट्स
अभिजीत देशपांडे- एलिझाबेथ एकादशी
जयंत जठार- हॅपी जर्नी
चारू श्रीरॉय- किल्ला
राजेश राव- सौ. शशीदेवधर
६) उत्कृष्ट छायाचित्रण
महेश अणे- ७रोशन व्हिला
अमोल गोळे- एलिझाबेथ एकादशी
अविनाश अरूण- किल्ला
संजय मेमाणे- लय भारी
प्रसाद भेंडे – लोकमान्य- एक युगपुरूष
७) उत्कृष्ट ध्वनिरेखाटन
प्रमोद चांदोरकर- क्लासमेट्स
अनमोल भावे- एलिझाबेथ एकादशी
अनमोल भावे- किल्ला
प्रमोद चांदोरकर – लोकमान्य – एक युगपुरूष
अनमोल भावे- मामाच्या गावाला जाऊया
८) उत्कृष्ट पार्श्वसंगीत
सुमीत बेल्लेरी- तप्तपदी
बापी-तुतुल – बाबांची शाळा –
समीर म्हात्रे – लोकमान्य- एक युगपुरुष
संतोष मुळेकर – विटी दांडू
नरेंद्र भिडे- रमा माधव
९) उत्कृष्ट गीतकार
दासू वैद्य – “मनी अचानक”- दुसरी गोष्ट
डॉ. सदाशिव जावडेकर – “उशाशी गंध”- गोंदण
गुरू ठाकूर, अजय-अतुल – “माऊली माऊली”- लयभारी
गुरू ठाकूर – “जीव भुलला”- लयभारी
वैभव जोशी – “हूल देऊनी”- तप्तपदी
१०) उत्कृष्ट पार्श्वगायिका
बेला शेंडे – “बावरे प्रेम हे”- बावरे प्रेम हे
कीर्ती किल्लेदार – “मनी अचानक”- दुसरी गोष्ट
प्रियांका बर्वे – “उशाशी गंध”- गोंदण
नेहा राजपाल – “जगण्याची आशा” – काकण
मधुरा दातार – “लूट लियो”- रमा माधव
११) उत्कृष्टपार्श्वगायक
हृषिकेश रानडे – “बावरे प्रेम हे”- बावरे प्रेम हे
हर्ष- अमितराज – “नवेनवे गीत हे मनाचे”- क्लासमेट्स
मंगेश धाकडे – “मनी अचानक”- दुसरी गोष्ट
स्वप्नील बांदोडकर – “ऐकावी वाटते”- गुरूपौर्णिमा
अजय गोगावले – “माऊली माऊली”- लय भारी
१२) उत्कृष्ट संगीतकार
अजय नाईक – “बावरे प्रेम हे” – बावरे प्रेम हे
ट्रॉय – आरिफ – “तुटताना तुटतो हा जीव का” -क्लासमेट्स
मंगेश धाकडे – “मनी अचानक” -दुसरी गोष्ट
अजय सिंघा – “जगण्याची आशा” – काकण
अजय- अतुल – “माऊली माऊली” -लय भारी
१३) उत्कृष्ट कथा
जेम्स अल्बर्ट- क्लासमेट्स
मधुगंधा कुलकर्णी- एलिझाबेथ एकादशी
तुषार परांजपे, अविनाश अरूण- किल्ला
समीर पाटील- पोश्टरबॉईज
जयंत पवार- तिचा उंबरठा
१४) उत्कृष्ट पटकथा
मधुगंधा कुलकर्णी- परेश मोकाशी- एलिझाबेथ एकादशी
तुषार परांजपे- किल्ला
समीर पाटील- चारूदत्त भागवत- पोश्टर बॉईज
सचिन कुंडलकर- हॅपी जर्नी
शर्वाणी सुधृत- अमोल शेडगे- सौ. शशीदेवधर
१५) उत्कृष्ट संवाद
क्षितिज पटवर्धन- क्लासमेट्स
मधुगंधा कुलकर्णी- परेश मोकाशी- एलिझाबेथ एकादशी
संजय पवार- लयभारी
समीर पाटील- पोश्टर बॉईज
कौस्तुभ सावरकर- सौ. शशीदेवधर
१६) उत्कृष्ट बालकलाकार
सायली भांडारकवठेकर- एलिझाबेथ एकादशी
श्रीरंग महाजन- एलिझाबेथ एकादशी
अर्चित देवधर- किल्ला
विवेक चाबुकस्वार- सलाम
निशांत भावसार- विटी दांडू
१७) उत्कृष्ट खलभूमिका
सिद्धार्थ जाधव – ड्रीममॉल
शरद केळकर – लय भारी
चिन्मय मांडलेकर – तिचा उंबरठा
सचित पाटील – क्लासमेट्स
सोनाली खरे – ७ रोशन व्हिला-
१८) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
नंदिता धुरी- एलिझाबेथ एकादशी
सुलभा आर्य- गुरूपौर्णिमा
तन्वी आझमी- लय भारी
श्रुती मराठे- तप्तपदी
ज्योती चांदेकर- तिचा उंबरठा
१९) उत्कृष्ट सहाय्यकअभिनेता
सिद्धार्थचांदेकर- क्लासमेट्स
संदीपपाठक- एकहजाराचीनोट
संजयखापरे- लयभारी
हृषिकेशजोशी- पोश्टरबॉईज
तुषारदळवी- सौ. शशीदेवधर
२०) उत्कृष्ट अभिनेत्री
उषा नाईक- एक हजाराची नोट
प्रिया बापट- हॅपी जर्नी
सई ताम्हनकर- सौ. शशीदेवधर
वीणा जामकर- तप्तपदी
तेजस्विनी पंडीत- तिचा उंबरठा
२१) उत्कृष्ट अभिनेता
भरत जाधव- चिंतामणी
अंकुश चौधरी- क्लासमेट्स
अतुल कुलकर्णी- हॅपी जर्नी
रितेश विलासराव देशमुख- लय भारी
सचिन खेडेकर- शटर
२२) उत्कृष्ट दिग्दर्शक
आदित्य सरपोतदार- क्लासमेट्स
परेश मोकाशी- एलिझाबेथ एकादशी
सचिन कुंडलकर- हॅपी जर्नी
निशिकांत कामत- लय भारी
समीर पाटील- पोश्टर बॉईज
२३) उत्कृष्ट चित्रपट
एलिझाबेथ एकादशी- मयसभा आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लि.
हॅपी जर्नी- एव्हरेस्ट एन्टरटेनमेंट प्रा. लि.
लय भारी- सिनेमंत्रा एन्टरटेनमेंट अॅण्ड मिडिया प्रा. लि.
लोकमान्य एक युगपुरूष- नीना राऊत फिल्म्स्
पोश्टर बॉईज- अॅफ्युलन्स मुव्हीज प्रा. लि.
व्यावसायिक नाटक
नामांकने
उत्कृष्ट नेपथ्य
प्रदीप मुळ्ये- ढॅण्टॅढॅण
हर्षद माने, विशाल नवाथे- बी. पी.
राजनभिसे- समुद्र
उत्कृष्ट प्रकाशयोजना
जयदीप आपटे- समुद्र
शीतल तळपदे- ढॅण्टॅढॅण
कुलभूषण देसाई- बी. पी.
उत्कृष्ट वेशभूषा
पौर्णिमा ओक- बेगम मेमरी आठवण गुलाम
वंदना शिंदे- कळत नकळत
ओंकार दत्त- ढॅण्टॅढॅण
उत्कृष्ट पार्श्वसंगीत
साई- पियुष- ढॅण्टॅढॅण
अमिर हडकर- कळत नकळत
गंधार संगोराम- बेगम मेमरी आठवण गुलाम
उत्कृष्ट रंगभूषा
करण थत्ते- अजब लग्नाची गजब गोष्ट
मिलिंद कोचरेकर- ढॅण्टॅढॅण
मिलिंद कोचरेकर- ज्योती सावित्री
उत्कृष्ट विनोदी कलावंत
केतन लुंकड- अजब लग्नाची गजब गोष्ट
मयुरी रानडे- सर्कीट हाऊस
समीर चौघुले- बी. पी.
संदेश उपश्याम- ढॅण्टॅढॅण
निखिल रत्नपारखी- बेगम मेमरी आठवण गुलाम
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
ज्ञानदा पानसे- त्या तिघांची गोष्ट
शर्वरी लोहकरे- चल थोडं एन्जॉय करू
लतिका सावंत- बेगम मेमरी आठवण गुलाम
गौरी सुखठणकर- ढॅण्टॅढॅण
चिन्मयी सुमीत- चल थोडं एन्जॉय करू
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
भूषण कडू- सर्कीट हाऊस
सुर्यकांत गोवळे- कळत नकळत
संकर्षण कराडे- बेगम मेमरी आठवण गुलाम
शशाकं केतकर- गोष्ट तशी गमतीची
हेमंत ढोमे- चल थोडं एन्जॉय करू
उत्कृष्ट लेखक
मंगेश पवार, कविता मोरवणकर- ज्योती सावित्री
मिहिर राजदा- गोष्ट तशी गमतीची
आनंद नाडकर्णी- त्या तिघांची गोष्ट
अनिल काकडे- कळत नकळत
निखिल रत्नपारखी- बेगम मेमरी आठवण गुलाम
उत्कृष्ट दिग्दर्शक
अद्वैत दादरकर- गोष्ट तशी गमतीची
अनिल काकडे- कळत नकळत
निखिल रत्नपारखी- बेगम मेमरी आठवण गुलाम
केदार शिंदे- ढॅण्टॅढॅण
विजय केंकरे- सर्कीट हाऊस
उत्कृष्ट अभिनेत्री
लीना भागवत- गोष् तशी गमतीची
मीन लबाळ- कळत नकळत
प्रतिक्षा साबळे – ज्योती सावित्री
स्पृहा जोशी- समुद्र
अश्विनी एकबोटे- त्या तिघांची गोष्ट
उत्कृष्ट अभिनेता
मंगेश कदम- गोष्ट तशी गमतीची
संजय खापरे- कळत नकळत
संजय नार्वेकर- सर्कीट हाऊस
शरद पोंक्षे- त्या तिघांची गोष्ट
भरत जाधव- ढॅण्टॅढॅण
उत्कृष्ट नाटक
गोष्ट तशी गमतीची- सोनल प्रॉडक्शन
कळत नकळत- अथर्व फॉर युक्रिएशन्स अॅन्ड प्रा. लि.
त्या तिघांची गोष्ट- अमृता प्रॉडक्शन श्रीसमर्थ प्रॉडक्शन
बेगम मेमरी आठवण गुलाम- नाट्यसंपदा
सर्कीट हाऊस- प्रवेश मुंबई
प्रायोगिक नाटक
नामांकने
उत्कृष्ट वेशभूषा
प्रितेश सोढा- ती
अमृता पाटील- झोपाळा
स्मृती खरबस- इस्कॅलॅवो
नीलम सकपाळ- महाभारत बिटवीन द लाईन
अमृता तोडरमल- वानरायण
उत्कृष्ट पार्श्वसंगीत
नरेंद्र भिडे- गोष्ट सिंपल पिलाची
संमोहन- झोपाळा
अरूण कानविंदे- २६-५२ उन्हापावसाची बेरीजवजाबाकी
ओजस भट, रिशित झवेरी- ती
संदीप पाटील, जनार्दन धात्रक- भेटी लागे जीवा
उत्कृष्ट नेपथ्य
थिएटर मॅजिक- झोपाळा
सचिन बहिरगोंडे- रानभैरी
प्रितेश सोढा- ती
राधिका इंगळे- गोष्ट सिंपल पिलाची
प्रवीण भोसले- तीचे संदर्भ नसलेली गोष्ट
उत्कृष्ट प्रकाशयोजना
प्रदीप वैद्य- गोष्ट सिंपल पिलाची
जयदीप आपटे- झोपाळा
रवी-रसिक- इन्शाअल्ला
अक्षय यादव- रानभैरी
विजय गोळे- तीचे संदर्भ नसलेली गोष्ट
उत्कृष्ट विनोदी अभिनेता
संदीप रेडकर- गोष्ट एका शाळेची
विनोद जाधव- गोष्ट एका शाळेची
क्षितिष दाते- गोष्ट सिंपल पिलाची
शुभम परब- दोस्ती तुटायची नाय
प्रसाद वैद्य- बाळू कासाराचा घोडा
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मृणाल वरणकर- इन्शाअल्ला
योगिता रानडे- एक बाकी एकाकी
कौमुदी वलोकर- गोष्ट सिंपल पिलाची
वेदांगी कुलकर्णी- झोपाळा
दीक्षा केतकर- मृगदर्पण
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
राहुल शिरसाट- पुरावाच काय आहे अमेरिकेला
गौरव मालणकर- स्लाईस ऑफ लाईफ
विभव राजाध्यक्ष- एक बाकी एकाकी
राहुल बेलापुरकर- रामराम पाव्हणं
प्रमोद शेलार- भेटी लागे जिवा
उत्कृष्ट अभिनेत्री
सुप्रिया विनोद- इंडियन समर
वासंति कावाळके- लास्ट लवस्टोरी
नेहा अष्टपुत्रे- पुरावाच काय आहे अमेरिकेला
नंदिता धुरी, शिल्पा साने, शुभांगी सावरकर- आयदान
सीमा घोगळे-पारकर- २६-५२ उन्हापावसाची बेरीजवजाबाकी
उत्कृष्ट अभिनेता
राजन जोशी- तीचे संदर्भ नसलेली गोष्ट
ओमकार तिरोडकर- ती
आशुतोष घोरपडे- २६-५२ उन्हापावसाची बेरीजवजाबाकी
सुशील इनामदार- इन्शाअल्ला
धम्मरक्षित रणदिवे- वानरायण
उत्कृष्ट लेखक
अभिजीत दळवी- भेटी लागे जिवा
रवी वाडकर- २६-५२ उन्हापावसाची बेरीजवजाबाकी
विभावरी देशपांडे- गोष्ट सिंपल पिलाची
संकेत तांडेल, पराग ओझा, प्रल्हाद कुरतडकर, महेश केसकर- एक बाकी एकाकी
दत्ता सावंत- महाभारत बिटवीन द लाईन
उत्कृष्ट दिग्दर्शक
राधिका इंगळे- गोष्ट सिंपल लग्नाची
संकेत तांडेल, पराग ओझा, प्रल्हाद कुरतडकर, महेश केसकर- एक बाकी एकाकी
अनंत अंकुश- तीचे संदर्भ नसलेली गोष्ट
पराग ओझा, सुशील जाधव, कृणाल आळवे- झोपाळा
सुषमा देशपांडे- आयदान
उत्कृष्ट नाटक
एक बाकी एकाकी- अथस्य, अस्तित्व
झोपाळा- म.ल. डहाणूकर महाविद्यालयाचे थिएटर मॅजिक
तीचे संदर्भ नसलेली गोष्ट- ऐश्वर्या आर्ट्स अॅन्ड थिएटर्स, सरगम क्रिएशन
आयदान- आविष्कार, अंजोर
ती- युटोपिया कम्युनिकेशन्स
यावर्षीच्या झी गौरव पुरस्कारासाठी मराठी चित्रपट विभागाकरिता जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.
यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि विद्याधर पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात संजय मोने, स्वाती चिटणीस आणि रविंद्र दिवकेर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी डॉ. अनिल बांदिवडेकर, विजय केंकरे आणि प्रदीप राणे यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.