‘र्हापसोडी २०१५’ राष्ट्रीय कला प्रदर्शन २५ फेब्रुवारीपासून मुंबईत
‘र्हापसोडी २०१५’ हे राष्ट्रीय कलाप्रदर्शन मुंबईत माडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन कुमारस्वामी हॉल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, काळा घोडा, मुंबई येथे २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०१५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुले राहील. या प्रदर्शनाचे उद्घाटन जेएसडब्लू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदाल यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
देशभरातील ४० नामवंत तसेच प्रथितयश कलाकारांना एकत्र आणून आयोजक शरद गुरव आणि साईप्रसाद जना यांनी हे प्रदर्शन सादर केले असून, मुंबई, पुणे,नाशिक, कोल्हापूर, मणिपूर, गुजरात, कोलकाता, विशाखा पट्टणम, हैदराबाद या भारतातील विविध ठिकाणच्या अनेक समकालीन कलाकारांची कला या ठिकाणी विविध माध्यमांव्दारे प्रदर्शित केली जाणार आहे. सादरकरणार्यांमध्ये वासुदेव कामत, सुहास बहुलकर, तुका जाधव अशा दिग्गजांचा समावेश आहे.या प्रदर्शनात तैल रंग, एक्रिलीक, चारकोल, मिश्र माध्यमे, जलरंगाच्या सहाय्याने कागद आणि कॅनव्हासवर चितारलेली अनेक चित्रं पहायला मिळतील. तर शिल्पकृतींमध्ये कांस्य, दगड, धातू अशा माध्यमांचा उपयोग केला आहे.
सदर प्रदर्शनातवासुदेव कामत,सुहास बहुलकर,तुका जाधव,प्रकाश वाघमारे या गुरूंबरोबरच प्रफुल्ल सावंत, प्रमोद कुर्लेकर, पराग बोरसे, भिवा पुणेकर, जगन्नाथ पॉल, सचिन सागरे, प्रतिभा वाघ, संदीप छत्रबंद, बापूसाहेब झांजे(शिल्पकार), रतन साहा (शिल्पकार), सुनील देवरे(शिल्पकार), प्रभाकर सिंग, आनंद प्रभुदेसाई, बाळासाहेब अभंग, सचिन पारेलकर, सिद्धार्थ शिंगाडे, सत्यजित वारेकर,उमाकांत कानडे, दत्तात्रय ठोंबरे, संतोष भोईर, गोपाल परदेशी,राहुल फुलकर, युवराज पाटील, प्रशांत शिंगाडे, मनीष सुतार,निलेश निकम, रमेश थोरात, रवी कट्टाकुरी, भास्कर राव बोत्चा,आसिफ शेख, गणेश हिरे, दिनेश परमार अशा सर्जनशील कलाकारांनी भाग घेतला आहे.
या प्रदर्शनातून जमा होणार्या निधीमध्ला काही हिस्सा ‘सेव द चिल्ड्रन इंडीया’ या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण कौशल्य, प्रतिभा आणि सर्जनशील शैली यांचा संगम असलेल्या या प्रदर्शनात मुर्त, अमुर्त आणि अर्धमुर्त चित्रांबरोबरच निसर्गचित्रं, व्यक्तीचित्रं,अलंकारीक, आध्यात्मिक अशा अनेक विषयांचा समावेश असलेली चित्रं पहाता येतील.