नीना सिंग यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन २४ फेब्रुवारीपासून
प्रख्यात चित्रकार नीना सिंग आपल्या चित्रकृतींचे ‘रीव्हेलेशन्स’ हे प्रदर्शन मुंबईतील काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत भरवत आहेत. ‘रीव्हेलेशन्स’ हे नीना सिंग यांचे दहावे प्रदर्शन आहे.
‘रीव्हेलेशन्स’बद्दल नीना सिंग म्हणतात की, ही कला म्हणजे मला अनपेक्षितपणे मिळालेली ईश्वरी देणगी आहे. मी आणि माझे मन थोडे मागे जात माझ्या चित्रकृतींना खोलवर अर्थ देण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीच्या अनोळख्या रहस्याचा उलगडा मला यावेळी येथे होतो. निराकार नेहमी जसे आकार शोधत असतो तसे मला या चीत्राकृतींमुळे आकार मिळाल्यासारखे वाटते. नीना सिंग यांच्या कलाकृती ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवडल्या गेल्या होत्या.
‘सेलेस्टीयल नोटेशन्स’ नावाच्या त्यांच्या प्रदर्शन ललित कला अकादमीने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला प्रेस टीव्ही इराणने त्यांच्या इंडिया आर्ट शोमध्ये प्रसिद्धी दिली होती. ‘कॉन्फ्लूएन्स’ ही त्यांची कलाकृती अमेरिकन ज्युरीड आर्ट सलूनच्या अठराव्या द्विभाषिक प्रदर्शनासाठी निवडली गेली होती. ‘लिव्हिंग ऑन द एज’ या त्यांच्या कलाकृतीची घोषणा आर्ट क्वेंच मॅगझीनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल ज्युरीड आर्ट कॉम्पीटीशन २०१३ मधील विजेता म्हणून झाली होती.
पुन:निर्मितीची जबरदस्त शक्ती असल्याने आणि स्वर्गीय सौंदर्याचे वरदान असल्याने त्यांच्या कलाकृती या स्मार्ट आर्ट कंपनी या जर्मनी येथील आर्ट गॅलरीमध्येही झळकल्या आहेत. तेथे भारतातील सर्वोत्तम कलाकृती प्रदर्शनात मांडल्या जातात.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क: जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा दूरध्वनी- २२८४३९८९
प्रदर्शन स्थळ: जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा, फोर्ट मुंबई
हे प्रदर्शन २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत खुले राहील.