जहांगीर आर्ट गॅलरीत कला प्रदर्शन मुंबईत सुरू
बॉम्बे आर्ट सोसायटीचे १२३वे कला प्रदर्शन मुंबईत सुरू आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक १७ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, ते २३ फेब्रुवारीपर्यन्त सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कला रसिकांना विनामुल्य खुले राहील.
या प्रदर्शनात तैलचित्रं, जलरंगातील चित्रं, चारकोल. मिश्र माध्यम, पेन आणि शाई, पेस्टल यांच्या सहाय्याने कागद आणि कॅनव्हासवरची चित्रं मांडण्यात येणार आहेत. शिल्पकृतींमध्ये कांस्य, मार्बल, लाकूड, धातू, मिक्स मध्यम यांचा वापर करून साकार केलेली शिल्प मांडण्यात येणार आहेत. वास्तववादी, अर्ध-वास्तववादी, निसर्गचित्रं, पोट्रेट, अलंकारिक, अध्यात्मिक असे अनेक विषय कलेच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत.
सदर प्रदर्शनात व्यावसाईक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त अशा कलाकारांच्या कलाकृती मांडल्या जाणार असून या कलाकारात चंद्रशेखर वाघमारे, नानासाहेब येवले, मदन पवार हरीराम फड, समिर पाटील, किरण कुंभार, देवज्योती धारा, महेश नायर,शाहेद पाशा, मनोज कुमार साकळे, संघपाल म्हस्के, वृक्क्षकेत साळस्कर, अर्जुन सिंग,प्रदीप घाडगे, तन्मय बॅनर्जी, शिलकुमार कुंभार, मीनल राजुरकर, प्रदीप केदार, दिप्ती सरमळकर, दिलीप दुधाने, योगेश लहाने, रोहन पवार, राकेश सूर्यवंशी,गणेश काळस्कर,मनीष हटकर, मनिंदर धुन्ना, श्रीकांत पांचाळ यांचा समावेश आहे. तर विद्यार्थी वर्गात शंतनू तालुकदार, संगम वानखेडे, क्रिष्णनाथ कुंभार, विनोद, सुमित सरकार, संदीप कुंभार,सलोनी कांबळे, मानसी जध, एव्ही, चेतन अत्री, साहिल नाईक, ऋत्विक मोंडल, पूजा एस शिवप्रसाद एस., रवींद्र लोहार, वर्षा निरंजन, केशव धृव, सिधी पारीख, रश्मी बावनकर, रुपेश सोनार अशा दोनशे पन्नासहून जास्त कलाकारांचा समावेश आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था पहिल्यापासून कलाकारांसाठी प्रेरणास्थान राहिली असून कलागुणांना वाव देताना त्याना व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रगण्य मानली जाते. महानगरीतील कलाकारांच्या प्रतिभेला दाद देण्यासाठी आणि पुन्हा एकदा कलेचा आस्वाद घेण्याकरीता या प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी.