बेलापूरमध्ये १ मार्चपासून शिरीश मितबावकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन!
ख्यातनाम चित्रकार शिरीष मितबावकर आपला ‘फ्रॅग्रन्स ऑफ लाइफ’ नावाचा एकपात्री प्रयोग नवी मुंबईतील शौर्य आर्ट गॅलरीत सादर करणार आहेत. या एकल प्रदर्शनाचे आयोजन १ मार्च ते ३१ मार्च २०१५ दरम्यान सकाळी ११ ते सायं ६ या वेळेत शौर्य आर्टस, सिटी टॉवर, सेक्टर १५, बी- विंग, पाचवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे केले जाणार आहे.
माझ्या कार्यक्रमादरम्यान विविध विषयांद्वारे माझ्या आयुष्यातील आनंदी क्षण मी टिपणार आहे, असेमितबावकर यांनी आपल्या प्रदर्शनाबाबत सांगितले. मी तुम्हाला खात्री देतो की या वेळी एक रंगांचा मोठा सोहळा असेल ज्यात मूड, उत्साह आणि आयुष्यातील आनंदी क्षण प्रदर्शनातील चित्रांद्वारे दाखवले जातील, असे मिठबावकर यांनी सांगितले.
मितबावकर एकूण ४०-४२ चित्रांचे प्रदर्शन भरवणार असून ती ४/ ६ फूट आणि १/१ फूट अशी असतील. त्यातून त्यांच्या या महिन्याभराच्या प्रदर्शनात फ्रॅग्रन्स ऑफ लाइफ दिसेल. ही चित्रे शारीर, निमसत्यार्थी आणि अॅब्स्ट्रॅक्ट वर्गातील असतील. अर्थात यातील रंगांची योजना चित्राचा मूड आणि विषय यांच्यानुसार वेगवेगळी असेल, असे मिठबावकर सांगतात.
नवी मुंबई येथे स्थित असलेले शिरीषमितबावकरहे ख्यातनाम चित्रकार आणि अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते आहेत. ते एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वांद्रे येथीलड्रॉइंग- पेटिंग या विषयाचे माजी प्रमुख आहेत. ते सध्या रचना संसद आर्किटेक्चर येथे व्हिजिटिंग लेक्चरर आहेत.
हे मितबावकर यांचे पाचवे एकल प्रदर्शन आहे. यापूर्वी त्यांनी एनएमएसएमध्ये १९९५ साली, जहांगीर कलादालनात २०१०साली, गॅलरी आर्ट एटर्न, दिल्ली येथे २०१२ साली आणि इंडिया आर्ट फेस्टिव्हल, मुंबई येथे २०१३ साली एकल प्रदर्शने आयोजित केली होती.