जहांगीरमध्ये सुरू आहे छायाचित्र प्रदर्शन
मुंबईतील प्रसिद्ध छायाचित्रकार व अभिनेत्री संगीता जोशी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कलादालनात २६ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, तेरसिकांना दि. ४ मार्चपर्यंत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनातून रसिकांना जगभरातील वेगवेगळ्या स्थळांचे भ्रमण करता येणार आहे.
संगीता जोशी यांनी आपल्या प्रदर्शनात देशातील तसेचपरदेशातील प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रे सादर केली आहेत.छायाचित्रणाची आणि फिरण्याचीआवड असल्यामुळे संगीता जोशी यांनी विविध स्थळांना भेट देऊन तेथील बर्फाच्छादित शिखरे,सूर्योदय, सूर्यास्तव दिवसाच्या अन्य प्रहरातील निसर्गाची विलोभनीय रुपे,काही ऐतिहासिकवास्तु आपल्या कॅमेरात टिपली असून ती छायाचित्रे या प्रदर्शनात पहायला मिळतील. यात शिकागो येथील डोनाल्ड ट्रम्पबिल्डिंग, हवाई येथील समुद्र किनारी पहुडलेलं १५० वर्ष जुनं कासव, शिकागो येथीलमरीना टावर,आयफेल टावर, अथेना येथील मंदिर,महाबळेश्वर येथील एलिफंटा हिल, चाईना, मकाऊ येथील फ्लायओवर, तुर्की येथील स्टोन माऊंट,ग्रीस येथील मंदिर अशी अनेक विलोभनीय देखाव्याची छायाचित्रे हया प्रदर्शनात पाहता येतील.
संगीता जोशी यांनी गुजराती रंगमंचावर आपल्या पूर्वायुष्यात सुमारे २५ गुजराती नाटकांमधून अभिनय केला आहे. एकता कपूरची “क्योंकी सास भी कभी बहू थी” ही प्रसिद्ध हिन्दीमालिका व “साथिया मा एक रंग ओछो” या गुजराती मालिकेत अभिनय करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच “रंग देबसंती” या चित्रपटात ओमपुरीच्या पत्नीची भूमिका साकारलीहोती.
या प्रदर्शनातील उल्लेखनीय बाब म्हणजे संगीता जोशी यांनी आशीष सोमपुरा,अतुल चौबे,सायरस श्रोंफ,फवजन हुसेन, मुकेशपारपियाणी व प्रसाद पावसकर या नामांकित छायाचित्रकारांनाआमंत्रित केले असून, रोज संध्याकाळी ५.३० वाजता त्यांचे मौलिक विचार सर्वांना ऐकता येणार आहेत.