मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर परिसरातील पु. ल. देशपांडे कला दालनात चार चित्रकारांचे कला प्रदर्शन २६ मार्चपासून सुरु होत आहे. संतोष शंकर लाड, सुनील लक्ष्मण डांगे, महेश्वर सिंह आणि दिप्पल शहा हे चार रंगलेखक आपल्या कलाकृती या प्रदर्शनात मांडणार आहेत.
संतोष लाड यांचे पेन्सिल स्केचद्वारे रेखाटलेले रामायण तसेच त्यांच्या अन्य कलरफुल पेंटिंग या प्रदर्शनात असणार आहेत. याशिवाय सुनील डांगे आणि महेश्वर सिन्हा याचे आईल पेंट माडर्न आर्ट तर दिप्पल शहा यांचे एक्रेलिक, मिक्समीडिया या प्रदर्शनात असणार आहेत. २६ ते २९ मार्चदरम्यान हे चित्रप्रदर्शन सकाळी ११ ते ७ या वेळेत कला रसिकांसाठी खुले राहील. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या प्रतीक्षा प्रमोद परब यांच्या हस्ते २६ मार्चला संध्याकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.