३० एप्रिलला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर
फक्त मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून अनेक दर्जेदार चित्रपट आजवर दाखवले असून हे नाविन्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असतात. येत्या रविवारी ३० एप्रिलला दुपारी १२ वा. व सायंकाळी ६ वा. ‘२ प्रेमी प्रेमाचे’ या प्रेमपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. अनवट वळणांचा सामना करत एक प्रेमी जोडपं कशारीतीने आयुष्याला सामोरं जातात याची हृदयस्पर्शी कथा म्हणजे २ प्रेमी प्रेमाचे हा चित्रपट.
सुपरस्टार स्वप्नील जोशी व सशक्त अभिनेत्री गिरीजा ओक यांची भूमिका असलेला हा प्रेमपट प्रेक्षकांना प्रेमाच्या अनुभूतीचा वेगळा अनुभव देईल.
प्रसारण – फक्त मराठीवर रविवार ३० एप्रिल दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा.