महाराष्ट्र कालानिधीने केली दुस-या पर्वाची घोषणा
महाराष्ट्र कलानिधीने ‘मराठी’ बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुस-या पर्वाची घोषणा करत पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वाला क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहे. एमबीसीएलच्या माध्यमातून कलाकारांचे दहा संघ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत. हे सामने ८ ते १० मे दरम्यान पाचगणीत रंगणार आहेत.
क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जणू जीव की प्राण.. कलाकार मंडळीसुद्धा त्याला अपवाद नाही, मात्र आपल्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांना क्रिकेटची आवड जपायला वेळ मिळतोच असं नाही, नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महराष्ट्र कलानिधीचे संस्थापक नितेश राणे आणि सचिव सुशांत शेलार यांनी एकत्र येत ‘मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीग’ची स्थापना केली आणि त्याचं पहिलं पर्व यशस्वी करून दाखवलं. आता ‘मराठी’ बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुस-या पर्वाची घोषणा करत पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वाला क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे, सुशांत शेलार आणि मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. गेल्यावर्षी ८ गटांमध्ये हे सामने रंगले होते. यंदा ‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ अशा दोन नव्या संघाच्या सहभागाची घोषणा आणि संघांच्या टीशर्टचे अनावरण यावेळी करण्यात आले.
‘मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीग’चे दुसरे पर्व ८ ते १० मे दरम्यान पाचगणी येथे रंगणार आहे. उपस्थित सर्व संघांना नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. अभिनेता श्रेयस तळपदे यांनी दोन नव्या संघाच्या शिलेदारांचे स्वागत करत दुसरं पर्व आपणही एन्जॉय करणार असल्याचं सांगितलं.
‘मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीग’ मध्ये‘ शिलेदार ठाणे’, ‘कोहिनूर नागपूर’, ‘डॅशिंग मुंबई’, ‘रत्नागिरी टायगर्स’, ‘शूर कोल्हापूर’, ‘मस्त पुणे’, ‘क्लासिक नाशिक’, ’फटाका औरंगाबाद’, ‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ हे दहा संघ सहभागी होणार आहेत. चौकार षट्कारांची आतषबाजी करायला कलाकार मंडळीसुद्धा सज्ज झाली आहेत.’मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सीझनची धमाल झी टॉकीजवर पाहता येणार आहे.
सहभागी होणारे संघ
मुंबई
नागपूर
रत्नागिरी
कोल्हापूर
पुणे
नाशिक
औरंगाबाद