मंजुनाथ मने यांच्या चित्रांचे जहांगीरमध्ये चित्रप्रदर्शन
कर्नाटक राज्यातील विजयपूरचे कलाकार मंजुनाथ माने यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन १३ एप्रिलपासून जहांगीर आर्ट गॅलरीच्या आवरण आर्ट प्लाझामध्ये सुरु झाले असून ते १८ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
मंजुनाथ माने हे १४ स्टेट आणि नॅशनल अवॉर्डचे मानकरी आहेत. २० हून अधिक कलाशिबीर आणि कला प्रदर्शनांत यांनी सक्रीय भाग घेतला आहे. त्यांच्या कलाकृती कर्नाटकात तथा अन्य राज्यातही प्रसिद्ध आहेत.
भारतीय कलेच्या परंपरेत ग्रामीण जीवनाचे चित्रण करून ती संस्कृती जपून ठेवणे हे आवश्यक आहे. पाश्चात्याच्या प्रभावामुळे आपल्या भारतीय ग्रामीण परंपरेचे मोल पुसले जात आहे. यांना परत जीवित करून त्यांना रंग भरणे आणि ते पुढील पिढीपुढे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तेच काम आपल्या रंग्लेखनातूनमंजुनाथ माने करीत आहेत. भारतीय परंपरचे अनमोल असे पैलू ते आजच्या पीढीपुढे मांडत आहेत.
माने यांच्या वैविध्यपूर्ण चित्रकला शैलीत ग्रामीण जीवनावर आधारीत चित्रे आपण पाहू शकतो. त्यांची चित्रे जीवनाशी निगडीत आहे.मानेंच्या चित्रकलेत विशेष करून भारतीय संस्कृतीचे आणि सांस्कृतिक जीवनाचे चित्रण दिसून येते.सामान्यांचे जीवन, त्यांची परंपरा, वेशभूषा, राहणीमान, रितीरिवाज, सण साजरे करणे अशा अनेक छटा मानेंच्या चित्रकलेत भरभरून उतरल्या आहेत.