कॉस्मिक हार्ट गैलरीत ३ जुलैपासून सुरु झाले चित्रप्रदर्शन
मुंबईमधील चित्रकार गौतम पाटोळे यांच्या रिअलीस्टीक फिगरेटीव पेंटिंगचे “फ्लाईट ऑफ फेंटसी” (कल्पनारम्य उड्डाण ) चित्रप्रदर्शन ३ जुलैपासून कॉस्मिक हार्ट गैलरी न्यू मरीन लाईन येथे सुरु झाले असून ते ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत रसिकांना पाहता येणार आहे.
गौतम पाटोळे यांनी वेगवेगळी चारकोल चित्रे काढली असून सिनेस्त्रुष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींची चारकोल चित्रे सुद्धा विशेष आहेत. वाणिज्य पदव्युत्तर असलेले आणि स्वत:चा वेगळा दृष्टीकोन असलेले गौतम पाटोळे यांनी सुरवातीला फोटो पत्रकार म्हणून सुरवात करून २००९ पासून त्यांनी एक स्वतंत्र चित्रकार म्हणून सुरवात केली.
गौतम पाटोळे यांची चित्रे प्रामुख्याने फिगरेटीव आहेत. त्यामध्ये त्यांनी भक्ती आणि पारंपारिकता, मुलांचे भावविश्व, बौद्ध भिक्खू, अनिमल किंगडम अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढली आहेत. त्यातील प्रत्येक चित्राची एक कथा आहे.
“फ्लाईट ऑफ फेंटसी” या चित्रप्रदर्शनात “एट द डोअर’, “लव”, “लव इस ब्लाइंड”, “इन द शेडो ऑफ ऑलमायटी”, “फ्लाईट ऑफ फेंटसी” अशी वेगवेगळी चित्रे पाहायला मिळणार आहेत.
“गौतम पाटोळे आणि त्यांची चित्रे रसिकांना पाहताना व्यस्त ठेवतात. त्यांची प्रत्येक कलाकृती मध्ये दृश्य स्वरुपाची असीम सौंदर्य आणि संपत्ती आहे. कलाकाराची चित्रे खूप शक्तिशाली आणि ती अधिक मार्गांनी बोलतात. एक वेळ आहे ज्या वेळी काळ्या आणि पांढऱ्या छटा आपल्याशी मल्टी मार्गांनी सवांद साधत असतात आणि दर्शक त्या प्रत्येक कालाकृतींचा प्रेमात पडत जातात असे कॉस्मिक हार्ट गैलरीचे क्रिएटिव्ह प्रमुख आणि संचालिका जल्पा विथलानी सांगतात.”
चारकोल म्हणजे…
चारकोल पेंटिंग हा खूप अवघड असा चित्रे काढण्याचा प्रकार आहे. चारकोल म्हणजे कोळशाचा वापर करून चित्रे काढणे. चारकोलची कोळशाची काळी एक पेन्सिल्स असते. त्यामुळे सफेद कागदावर काढलेली चित्रे खूप उजळून दिसतात. केनवास आणि पेपरवर चित्रे काढण्यासाठी कोणत्याही रंगांचा उपयोग केलेला नसतो.
प्रदर्शन कालावधी : ३ जुलै २०१५ ते ३ ऑगस्ट २०१५
वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७.
स्थळ : कॉस्मिक हार्ट गैलरी, जी-२ए कोर्ट चेम्बर्स ३५, न्यू मरीन लाईन मुंबई ४०००२०.