हॉटेल ट्रायडंटमध्ये २४ आणि २५ जुलैला ‘खजाना’
कर्करोग सहायता आणि थॅलेसेमियावरील जागृतीच्या निधी संकलनासाठी ‘खजाना’ या गझल महोत्सवाचे चौदावे पर्व मुंबईमध्ये २४ व २५ जुलै २०१५ रोजी हॉटेल ट्रायडंट, द रिगल रूम येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी गझल गायक पंकज उदास, अनुप जलोटा, गायिका रेखा भारद्वाज, शिवानी वासवानी, गायक जावेद अली, संदीप बात्रा, सुदीप बॅनर्जी, पंडित अजय पोहनकर, अभिजित पोहनकर, ज्येष्ठ रंगकर्मी सलीम आरिफ, छोटे कलाकार राशी हरमळकर आणि वारेन्यम पंड्या, ओबेरॉय हॉटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष देवेंद्र भारमा आणि सीपीएएचे अध्यक्ष वाय के सप्रू आदी मान्यवर एकत्र आले होते.
द रिगल रूमच्या अत्यंत नाट्यमय अशा इंटीरीयरमध्ये अत्यंत प्रतिभावान असे गझलगायक एका सामाजिक जाणीवेतून एकाच व्यासपीठावर एकत्र गाणार आहेत. हृदयाला भिडणा-या मधुर संगीताची चौदा वैभवशाली वर्षे साजरी करताना द ऑबेरॉय, मुंबई गझलांचा ‘खजाना’ हा महोत्सव आयोजित करत आहे. हे आयोजन कर्करोग उपचार आणि थॅलेसेमिया जागृतीसाठी केले जात असून त्यात आघाडीचे गझल गायक सहभागी होत आहेत. पंकज उदास, अनुप जलोटा, रेखा भारद्वाज, तलत अझीझ, जावेद अली, पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर, सुदीप बॅनर्जी यांचा त्यात समावेश आहे.
द कॅन्सर एड असोसीएशन (सीपीएए), द पॅरेंट असोसीएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या संस्था कर्करोग आणि थॅलेसेमिक रुग्ण आणि मुलांसाठी हे निधीसंकलन वार्षिक आयोजनातून करतात. या आयोजनातून गझलप्रेमींना भारतातील अगदी नामवंत कलाकारांच्या उच्च आणि दमदार अशा गायनाचा अनुभव घेता येणार आहे.
‘खजाना’ हा गाझालांचा महोत्सव असून गेली चौदा वर्षे ही संकल्पना राबविली जात आहे. गझल गायकांना त्यांची प्रतिभा उच्च कोटीच्या रसिकांसमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून या उपक्रमाला सुरुवात झाली होती.
“या अनोख्या अशा संकल्पनेसाठी पंकज उदास यांनी साधारण चौदा वर्षांपूर्वी भागीदारी देऊ केली, तेव्हा द ओबेरॉयच्या प्रयत्नांना ती सुयोग्य अशी दाद होती. जेव्हा ओबेरॉयने अनेक वर्षांपूर्वी समाजसेवेची ही सुरुवात केली तेव्हा मुंबईच्या कला क्षेत्रातून अगदी मोजकी मदत आम्हाला मिळाली होती. टाटा मेमोरियल रुग्णालयाबरोबर संस्था राबवीत असलेला ‘टेरी फोक्स रन’ उपक्रम असो की अलिबाग येथील एसओएस चिल्ड्रेन व्हिलेजसाठी राबविण्यात येणारा ‘प्रोजेक्ट सक्षम’ असो, ओबेरॉय, मुंबईने नेहमीच मुंबईत सहाय्यभूत आणि स्वयंस्फुर्त असे नागरिकत्व पार पाडले आहे,” असे उद्गार ओबेरॉय ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष देवेंद्र भारणा यांनी काढले.
भारतातील आघाडीचे गझल गायक गाणार असलेल्या या महोत्सवामध्ये ओबेरॉय, मुंबईला विशेष आनंद आणि अभिमान आहे कारण त्यामाध्यमातून एका चांगल्या उद्देशासाठी काम करत राहणे शक्य होणार असून त्यातून शहरातील या घटकाला अत्यंत आवश्यक अशी मदत होणार आहे.”
पंकज उदास म्हणाले, “खजानाच्या माध्यमातून गझलगायनातील भावी प्रतिभेला रसिकांसमोर सदर करणे हा आमचा हेतू आहे. त्याचमुळे या कार्यक्रमाची थीम आम्ही ‘फ्रॉम लीजंड्स टू जेननेक्स्ट’ अशी ठेवली आहे. ते पुढे म्हणाले की, गझल गायन आणि कविता या गोष्टी आमच्या संस्कृतिचा एक अंतर्गत भाग आहे. ‘खजाना’ हा गझलांचा महोत्सव आहे आणि तो कलेच्या या प्रकारासाठी समर्पित केला गेला आहे.”
“या खास अशा प्रसंगी आम्ही गझला आणि नज्म यांचे सिंहावलोकन आयोजित केले आहे. त्यामाध्यमातून काही अत्यंत महत्वाच्या आणि लोकप्रिय गझला आणि नज्म सदर केल्या जाणार आहेत. हा संगम अनेक कलाकारांच्या एकत्रित आकाशगंगेतून साध्य होणार आहे,” असेही पंकज उदास यांनी म्हटले.
यंदा ‘खजाना’मध्ये अनेक प्रतिभावान कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांत अनुप जलोटा, श्रीमती रेखा भारद्वाज, श्री तलत अझीझ, श्री जावेद अली, पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर, संदीप बात्रा, सुदीप बॅनर्जी, श्रीमती शिवानी वासवानी आणि युवा कलाकार ऐशानी बॅनर्जी, राशी हरमळकर आणि वारेन्यम पंड्या तसेच सदाबहार पंकज उधास यांचा समावेश आहे.
दोन दिवस साज-या होणा-या कार्यक्रमातून संकलित होणारा निधी कर्करोग आणि थॅलेसेमिया यांपासून त्रस्त रुग्णांची निगा आणि त्यांचे पुनर्वसन यांसाठी होणार आहे. प्रवेशिका या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका केवळ ऱ्हीदम हाऊस येथेच १६ जुलै २०१५ पासून उपलब्ध असतील.
निधीसंकलनासाठी देणगी या आयोजनामधून उभा राहणारा निधी हा कॅन्सर पेशंट्स एड असोसीएशन आणि पॅरेनट्स असोशिएशन थॅलेसेमिक युनीट ट्रस्ट यांना देणगीरूपाने दिला जाणार आहे. तब्बल ६० लाख रुपयांचे संकलन झालेल्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या देखण्या यशानंतर द ओबेरॉय, मुंबई आणि पंकज उधास पुन्हा एकदा या दोन संघटनांशी संयुक्तपणे भागीदारी करत आहेत. त्याद्वारे या कलात्मक प्रयत्नामध्ये आणि एक मैलाचा दगड साध्य होत आहे.