या महोत्सवासाठी अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, चीन, इराण यांसारख्या वेगवेगळ्या देशातील सुमारे ३००० चित्रपट स्पर्धेमध्ये होते. ७ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये हा सोहळा केलिफोर्निया येथे रंगणार असून या महोत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चेन, अभिनेत्री शेरान स्टोन, मार्टिन शीन यांच्यासह हॉलीवूडच्या अनेक दिग्ग्दज अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे. आपल्या मातीत बनलेल्या या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेतल्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद झाल्याचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी सांगितले.
‘मनातल्या उन्हात’ची श्रेयनामावली
निर्मिती संस्था : आनंद सागर प्रॉडक्शन
निर्माती : विजयश्री पाटील
दिग्दर्शन : पांडुरंग जाधव
कथा : संजय पाटील
पटकथा : विद्यासागर अध्यापक, पांडुरंग जाधव
संवाद : विद्यासागर अध्यापक
छायाचित्रण : नागराज दिवाकर
संकलन : निलेश नवनाथ गावंड
गीत : विश्वराज जोशी
संगीत : राहुल मिश्रा
गायक, गायिका : आदर्श शिंदे, रंजना जाधव-माने
पार्श्वसंगीत : अश्विन श्रीनिवासन
कलाकार
समीर धर्माधिकारी – संजय
कैलास वाघमारे – तात्या
मिताली जगताप – छबुताई
किशोर कदम – अण्णा
नागेश भोसले – हणमंतराव
रुचिता जाधव – संजयची पत्नी
छाया कदम – कैलासची आई
अमोल नाईक – संपत
प्रमोद फडतरे – अर्जुन
बालकलाकार
हंसराज जगताप – बालपणीचा तात्या
मंथन पाटील – संजयचा मुलगा
ओविशिखा पाटील – संजयची मुलगी