आगामी ‘झरी’ चित्रपटात साकारताहेत महत्वाची भूमिका
सातारा येथील प्रसिद्ध समाज सेवा पार्टी (महाराष्ट्र) या संस्थेच्या वतीने चित्रपटातील योगदानाबद्दल वंदना भगत यांना मानाचा पुरस्कार देण्यात आला. वंदना भगत आगामी ‘झरी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका सकारात असून, आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य अधोरेखित केले आहे.
नाशिक येथून मुंबईत आलेल्या वंदना भगत यांचा २०११ मध्ये ‘शपथ तुला शंभुची’ या लघुपटाने अभिनयाचा प्रवास सुरु झाला. पुढे ‘भानामती’, ‘आमचा विचार करा ना’, ‘उधो उधो ग वालुंबाई’, ‘स्वामी’ इ चित्रपटात विशेष भूमिका साकारत राजू मेश्राम लिखित- दिग्दर्शित ‘झरी’ चित्रपटात वंदना भगत यांची लक्षवेधी भूमिका आहे.
मुंबईच्या वेगवान जीवनात चित्रपटासोबत ‘मधू इथे चंद्र तिथे’, ‘लक्ष्य’, ‘कमला’, ‘सावधान इंडिया’सारख्या मालिकांमध्ये देखील वंदना यांनी आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. याबाबत त्या सांगतात की, ‘कलाकाराला त्याच्या कामाची दखल घेतली जाते यातच सर्व काही आहे, परंतु पुरस्काराने आता माझी जबाबदारी नक्कीच वाढली आहे.’