‘तू हि रे’मध्ये दिसणार महत्वाच्या भूमिकेत
पदार्पणातच एकापेक्षा एक हिट सिनेमात काम करून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी मृणाल जाधव ४ सप्टेबर रोजी प्रदर्शित होणा-या संजय जाधव दिग्दर्शित ‘तू हि रे’ या सिनेमात दिसणार आहे.
मृणालने ‘तू हि रे’ या सिनेमात स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्यासोबत महत्वाची भूमिका सकाराली आहे. ‘लय भारी’ सिनेमामधील छोटी रुक्मिणी प्रेक्षकांना खूप भावली. गोड, निरागस आणि चुणचुणीत अशा मृणालने आत्तापर्यंत ‘राधा ही बावरी’, ‘कोर्ट’, ‘नागरिक’, ‘टाइमपास २’, ‘दुश्यम’ असे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे मृणाल तिच्या लाडक्या छोट्या चाहत्यांना ‘ ‘तू हि रे’च्या निमित्ताने कोणत्या रुपात पाहायला मिळते याबाबत नक्कीच उत्सुकता आहे.