३० ऑगस्ट दुपारी १२ वाजता व सायं ६ वाजता
लोकमान्यांच्या विचारांचा पुरस्कार करणारा अन् त्यांच्या तत्त्वज्ञानाला नवी झळाळी देऊ पाहणारा ‘लोकमान्य- एक युगपुरूष’ हा चित्रपट ३० ऑगस्ट दुपारी १२ वाजता व सायं ६ वाजता झी टॉकीजवर प्रक्षेपित होणार आहे.
स्वराज्याचा ध्यास बाळगणा-या लोकमान्य टिळकांनी वेगवेगळ्या प्रसंगात कशी भूमिका घेतली, आपल्या तत्त्वांसाठी, मग ती जहाल असली तरी ते कसे आग्रही राहिले, परकीय इंग्रजांविरुध्द झगडताना स्वकीयांशी कसा लढा दिला, याचं दर्शन या चित्रपटातून घडतं. नीना राऊत निर्मित एस्सेल व्हिजन प्रस्तुत ‘लोकमान्य -एक युगपुरूष’ या चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, समीर विद्वांस, अंगद म्हसकर, प्रिया बापट, श्वेता भेंडे, दीपेश शहा, प्रशांत उथळे, विक्रम गायकवाड आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. लोकमान्य नेहमी म्हणत, ‘स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीने स्वत:च्या प्रगतीबरोबरच देशाच्या प्रगतीचाही विचार केला पाहिजे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले तरच त्यांची पिढी सुखी होईल आणि देश पुढे जाईल.’ आज आपली राजकीय, सामाजिक परिस्थिती नैतिक मूल्य कमालीची ढासळत असतांना टिळकांच्या विचारांची गरज पदोपदी जाणवते. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने त्यांनी तरुणांच्या मनात स्फुलिंग चेतवले होते. या चित्रपटाच्या रूपाने दाखवली जाणारी लोकमान्य टिळकांच्या विलक्षण प्रवासाची अनुभूती आजच्या तरुणांसाठीसुद्धा प्रेरणादायी ठरेल.