तू हि रे ****
प्रेमात असते सुंदरता. ती सांगण्यासाठी करावा लागतो साजशृंगार. त्यातूनच साकारला जातो देखणा आविष्कार. संजय जाधव यांनी ‘तू हि रे’ या मराठी चित्रपटाला असेच सर्वांगाने शृंगारीत करून त्रिकोणी प्रेमाची एक देखणी कलाकृती सिनेरसिकांसमोर पेश केली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून हा चित्रपट गुंतवून ठेवणारा आहे. चित्रपटाचे गीत-संगीत, लोकेशन्स, चित्रपटाची गोष्ट, त्यातील संवाद, कलावंतांचा अभिनय या सा-या गोष्टीचे विणकाम उत्तमपणे करीत हा चित्रपट मनोरंजन करतो. जगण्याचे नियम सांगतो. ताणतणावातही आपले घरटे जोपासून ठेवण्याचा हसत खेळत कानमंत्रही देतो.
स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, गिरीश ओक अशा तगड्या स्टारकास्टसोबतच मृणाल जाधव या ‘अनुभवी’ बालकलावंत मुलीने आपल्या अभिनयाची श्रीमंती पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
सिनेमाची गोष्ट सिद्धार्थ (स्वप्नील जोशी), नंदिनी (सई ताम्हणकर) आणि भैरवी (तेजस्विनी पंडीत) यांच्या त्रिकोणी प्रेमाभोवती गुंफली गेली आहे. नंदिनी ही एका गावात राहणारी मुलगी. तरीही बिनधास्त. आपला प्रेमविवाह व्हावा, अशी तिची मनीषा, पण गावात भरल्या कुटुंबात वावरणा-या नंदिनीला सुंदर असूनही कुणाकडून प्रेमाचे प्रपोजल येतच नाही. एक दिवस तिच्या वडिलांना लग्नाची मागणी घालणारे पत्र येते. थेट मुंबईवरून. सिद्धार्थ त्याचे नाव. त्याचे लग्न नंदिनीसोबत होते. ती गावातून मुंबईत येते. त्यांना त्यांना पियू (मृणाल जाधव) नावाची मुलगी होते. ती सात-आठ वर्षांची झाली आहे. सिद्धार्थ मुंबईत एका कंपनीत अभियंता आहे. तिच्यासोबत दोघांनीही आपला छान संसार सजवला आहे. आनंदी आहेत. त्यात प्रतापराव भानुशाली (गिरीश ओक) नावाचा एक गृहस्थ या गोडगुलाबी प्रेमाला एक अनपेक्षित धक्का देतो आणि चित्रपटाची गोष्ट या धक्क्याभोवती प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. तो धक्का कोणता? या कथेत भैरवीच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित कशी एन्ट्री घेते, हे सारे चित्रपटातच बघितलेले बरे!

गिरीश ओक यांच्या वाट्याला मोजके दोन-तीन दृश्य आलेले आहेत. तरीही ते या चित्रपटात सिनेमाभर आपले अस्तित्व सांगून गेले आहेत. तेजस्विनीचा देखनेपणा लाजवाब आहे. संगीताने या चित्रपटाला साजेशी लय दिली आहे. त्यासाठी संगीतकार अमितराज, पंकज पडघन, शशांक पोवार या तिघांचेही खास अभिनंदन केलेच पाहिजे. ‘सुंदरा…’, ‘गुलाबाची कली’, ‘तोळा तोळा’, ‘जीव हा सांग ना’ ही गाणी चित्रपटाच्या गोष्टीला तालासुराने सजवण्यात हक्काची जागा मागणारी आहेत. वैशाली सामंत, अमितराज, उर्मिला धनगर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, सायली पडघन यांनि या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. एकदा तरी नक्की बघावा असा हा गोड सिनेमा आहे.
तू हि रे
निर्मिती : करण एंटरटेनमेंट, इंडियन फिल्म्स स्टूडिओ, ड्रिमिंग ट्वेंटी फोर / सेव्हन
निर्माते : मृदुला पडवळ- ओझा, शीतल कुंमार – मनेरे, आशिष वाघ, उत्पल आचार्य, दीपक राणे
सहनिर्माता : संजय घोडावत
दिग्दर्शक : संजय जाधव
कथा : मनस्विनी लता रवींद्र
पटकथा संवाद : अरविंद जगताप
छाया दिग्दर्शक : प्रसाद भेंडे
संगीत दिग्दर्शक : अमितराज, पंकज पडघन, शशांक पोवार
गीते : गुरु ठाकूर
गायक : अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, बेला शेंडे, सायली पंकज
वेशभूषा : हर्षदा खानविलकर
कला दिग्दर्शक : सतीश चिपकर
नृत्य दिग्दर्शक : उमेश जाधव, सुजित कुमार

कलाकार : स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, मृणाल जाधव, गिरीश ओक, सुशांत शेलार