जहांगीरमध्ये रामजी शर्मा यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु
मुंबईमधील प्रसिद्ध चित्रकार रामजी शर्मा यांचे ‘टच मी नॉट’ या शीर्षकाखाली एकल ३डी चित्रकला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत २१ सप्टेंबरपासून सुरु झाले असून ते २७ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
चित्रकार रामजी शर्मा हे गेली २५ वर्षे ३डी चित्रे काढत असून त्यांनी त्यांचे फाईन आर्टचे शिक्षण कला शाखेमधून गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये घेतले होते. त्यांनी वास्तववादी चित्रे, तैल चित्रे, एबस्ट्रॅक्ट, पेन्सिल, चारकोल, एक्रेलिक असे सर्व चित्रकला प्रकार हाताळले आहेत. रामजी शर्मा हे भारतातील काही मोजक्याच चित्रकारांपैकी आहेत ज्यांनी ३डी चित्रकला अदभूत प्रकार हाताळत आहेत.
रामजी शर्मा यांची चित्रे खूप वेगळी आहेत. ती चित्रे तुम्हाला लगेच आकर्षित करतात आणि तुम्ही स्व:ताला त्या चित्रांना स्पर्श करण्या पासून रोखू शकत नाही. म्हणूंनच या प्रदर्शनाला ‘टच मी नॉट’ हे एकदम समर्पक शीर्षक दिले आहे.
रामजी शर्मा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आर्ट शो आणि ग्रुप शोमध्ये सहभाग घेतला आहे. या चित्र प्रदर्शनामध्ये त्यांची ५० नवीन चित्र आहेत.