२५ आणि २६ नोव्हेंबरला रंगणार सांगीतिक सोहळा!
मुंबईत नेहरू सेंटर येथे आयोजित केलेल्या अनोख्या ‘फ्युजन फेस्टिवल २०१५’मध्ये आघाडीचे संगीत कलाकार सहभागी होत आहेत. २५ आणि २६ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा अनोखा महोत्सव होणार असूनद इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
२५ नोव्हेंबरला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘पिया बावरी’ या बँडची अदाकारी पेश होणार आहे. नव्या दमाच्या कलाकारांचा हा बँड पारंपारिक संगीताचा मिलाफ समकालीन संगीताशी करून फ्युजन सादर करतो. संगीत रचनाकार आणि किबोर्ड कलाकार अभिजित पोहनकर यांनी भारतीय पारंपारिक संगीत क्षेत्रात नवीन ध्वनीची निर्मिती केली असून ते त्यांचे वडील पंडीत अजय पोहनकर यांच्याबरोबर आपली कला सादर करणार आहेत.
पंडित अजय पोहनकर हे ‘पिया बावरी’चा आवाज आहेत. हा संगीत प्रकार सर्वच वयोगटातील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करेल यात शंकाच नाही.
प्रख्यात कव्वाली गायक मुनव्वर मासूम हे ‘पिया बावरी’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून गाणार आहेत. ते ठुमरी आणि कव्वाली याचा अनोखा असा मिलाफ सादर करणार आहेत. पहिल्या दिवसाच्या सांगतासमयी ‘राकेश अँड फ्रेंड्स’ (आरएएफ) या बँडच्या माध्यमातून युवा संगीत कलाकार एकत्र येणार आहेत. बासरीवादक राकेश चौरसिया, ड्रमवादक जीनो बँक्स, तबलावादक सत्यजित तळवलकर, बास गीटारवादक शेल्डन डिसिल्व्हा, गिटारवादक संजय दास यांच्यासह किबोर्डवर संगीत हल्दीपूर हे नव्या दमाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
आघाडीची पार्श्वगायिका अनुशा मणी ‘शानदार’मधील गाजलेले ‘गुलाबो’ हे अगदी अलीकडील गाणे सादर करणार आहे. ती पाहुणी कलाकार म्हणून सहभागी होईल. हा कार्यक्रम म्हणजे शास्त्रीय संगीत आणि फ्युजन यांचा एक अनोखा असा आविष्कार असणार आहे आणि तो सर्व होतकरू कलाकारांकडून सादर होणार आहे.
‘राकेश अँड फ्रेंड्स’ या ग्रुपने अख्या जगभर प्रवास करत आपली कला सदर केली आहे. ‘केप टाऊन जॅझ’ महोत्सवात कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळालेला तो एकमेव ग्रुप होता.
२६ नोव्हेंबरला महोत्सवात दुस-या दिवशी ‘इंडीवा’ हा ग्रुप कार्यक्रम सादर करणार आहे. चार महिला संगीतकार एकत्र येऊन जादू, समर्पण, हस्तकौशल्य आणि शैली यांचा अनोखा आविष्कार संगीताच्या माध्यमातून घडविणार आहेत. त्यांच्या संगीतामध्ये हिंदुस्तानी, कर्नाटकी, जॅझ, शास्त्रीय आणि जागतिक संगीताचा अनोखा असा मिलाफ आहे. रागांवर आधारित सुमधुर संगीताच्या धुनी, भारतीय तालाचे कौशल्यपूर्ण सादरीकरण, वेगळी शैली आणि एक अनोखा बाज हे सर्व आठ भाषांमध्ये ज्यांनी सादर केले ते संगीत रचनाकार, संयोजक आणि निर्माता मर्लिन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण होईल. युवा सितारवादक रवी चारी आणि युवा बॅले नर्तिका अदिती भागवत या कार्यक्रमात पाहुणे कलाकार म्हणून सहभागी होत आहेत.
“अनुक्रमे इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांचे नेतृत्व करणारे नायाब आणि वैभव यांनी आयोजित केलेल्या फ्युजन फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता ‘इंडीवा’ला आहे. या दोघांनीही प्रत्येक कार्यक्रमाला स्वतःची अशी एक वेगळी ओळख, अर्थ आणि दृष्टी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यातून सर्वसामान्य रसिकांना परिपूर्ण असे मनोरंजन प्राप्त करून दिले जाते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन संपूर्ण देशभरात केले आहे. त्यातही भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील त्यांच्या आयोजनाचे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे उद्गार मर्लिन डिसोझा यांनी काढले आहेत.
या महोत्सवाची सांगता ‘समर्पण’ या युवा कलाकारांच्या अदाकारीने होणार आहे. पारंपारिकरित्या उंची असे भारतीय शास्त्रीय संगीत एका समर्पणाच्या भावनेतून या युवा संगीतकारांकडून सादर होणार आहे. ‘समर्पण’ चमूने आत्तापर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या अशा महोत्सवांमध्ये आपली अदाकारी सादर केली आहे. त्यांत बडोदा येथे ‘संस्कारम’, हैदराबाद येथील ‘हैदोराईट’ यांचा समावेश आहे. या चमूमध्ये तबल्यावर ओजस अधिया, किबोर्डवर विशाल धुमाळ, बासरीवर निनाद मुळावकर, तंतुवाध्यावर गौतम शर्मा, व्हायोलीनवर मानस कुमार आणि सक्साफोनवर आय डी राव सहभागी होणार आहेत. प्रख्यात गझलगायक पंकज उधास हे ‘समर्पण’मध्ये पाहुणे गायक कलाकार म्हणून सहभागी होत आहेत. ‘फ्युजन फेस्टिवल २०१५’ला युनियन बँक ऑफ इंडिया, मिनीमॅक्स आऊटडोअर आणि टाईम्स कार्ड यांचे पाठबळ लाभले आहे. ‘फ्युजन फेस्टिवल २०१५’चे संयोजन आणि व्यवस्थापन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांचे आहे. या दोन्ही संस्था प्रत्येक आयोजनाला एक वेगळा अर्थ, ओळख आणि दृष्टी मिळावी यासाठी विशेष प्रयत्नशील असतात. त्यातून परिपूर्ण असे मनोरंजन तर प्राप्त होतेच पण त्याचबरोबर व्यावयिकाताही जपली जाते आणि त्यातून सर्वसामान्य रसिकांचे हितही जपले जाते. या संस्थांचा मुख्य हेतू हा भारताच्या सांगीतिक प्रतिभेचा उच्च वारसा भारत आणि भारताबाहेरील रसिकांसमोर ठेवावा हा आहे. द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी आत्तापर्यंत कित्येक सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन आणि व्यवस्थापन केले आहे. त्यांतही त्यांनी देशभरात आयोजित केलेल्या भारतीय शास्त्रीय संगीत कार्यक्रमांना विशेष महत्व आहे.
अधिक माहितीसाठी नेहरू सेंटर (दूरध्वनी- २४९६४६८०) किंवा www.bookmyshow.com वर संपर्क साधावा.