‘देवां’नी दिल्या ‘ऑस्कर’ जिंकण्यासाठी शुभेच्छा!
अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या आणि ओम श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या किरण नाकती दिग्दर्शित ‘सिंड्रेला’ सिनेमाचा फर्स्ट लुक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा मोठ्या दिमाखात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘या ‘फर्स्ट लुक’ने माझी उत्सुकता प्रचंड वाढली असून, ‘सिंड्रेला’ ऑस्कर नक्की जिंकणार’ अशा शुभेच्छा देव यांनी दिल्या.
दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर करत ५९०० हूनही जास्त पात्रं रंगवत, २४३ कट्ट्याचा विक्रम या अभिनय कट्ट्याने केला. ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी रविवारची एक सुखद संध्याकाळ अनुभवयाला सुरुवात केली. तसेच हा कट्टा पत्रकारांच्या लेखणीची पसंती बनला.
प्रख्यात दिग्दर्शकांच्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या कौतुकाला पात्र ठरला. कलाकारांची पंढरी, मूल्यांना व संस्कुतीला जपत फक्त कलाकार नव्हे तर माणूस घडवणारी संस्था अशी ओळख अभिनय कट्ट्याने निर्माण केली. मुळात ‘सिंड्रेला’ या नावातच या सिनेमाचे एक वेगळेपण असून या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक या सिनेमात दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून माझी उत्सुकता वाढली आहे.
रुपेश आणि यशस्वी या दोन निरागस मुलांचा अभिनय तर फार कमालीचा आहे. केवळ सिनेमात स्टार मंडळी असून उपयोग नसतो तर सिनेमातील कलाकारांचा अभिनय आणि सिनेमाचा विषय हा महत्वाचा असल्याचे ज्य्स्थ अभिनेते रामेस देव यांनी आवर्जून नमूद केले. अडीच मिनिटांचा हा ट्रेलर माझ्या मनाला भिडला असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा नक्कीच एक इतिहास रचेल अशी मला खात्री असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच या सिनेमाचे ५० शोज मी स्वतः घेईन असे जाहीर केले.
‘सिंड्रेला’ हा जरी माझा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा असला तरी हा सिनेमा माझ्या एकट्याचा नसून हा अभिनय कट्ट्याच्या सर्व कलाकारंचा आहे म्हणूनच मी किरण नाकती आणि टीम असे नाव सर्वत्र पब्लिसिटीवर लावले आहे. सर्वच कलाकार, तंत्रज्ञ मंडळीनी मला उत्तम सहकार्य केले त्यामुळेच हा सिनेमा तयार होऊ शकला. तसेच महाराष्ट्रातील काही अनाथालयात आम्ही हा सिनेमा दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एकंदरीत या सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून ही ‘खरी कथा की परी कथा’ हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ४ डिसेंबरला हा सिएनम सिनेमागृहात जाऊन पहावा लागणार असल्याचे दिग्दर्शक किरण नाकती यांनी सांगितले.
‘सिंड्रेला’ सिनेमाची कथा किरण नाकती, आदित्य हळबे यांची असून पटकथा, संवाद किरण नाकती यांचे आहेत. या सिनेमात अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही आपल्याला पहायला मिळणार आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून मुरलीधर गोडे, ओमकार मंगेश दत्त, निकेत चौधरी यांनी लिहिलेल्या भावपूर्ण गीतांना किरण- गौरव या नव्या दमाच्या संगीतकारांनी श्रवणीय असे संगीत दिले आहे.
पंकज पडघन यांनी या सिनेमाचे पार्श्वसंगीत केले असून सिनेमाचे थीम सॉंग ही त्यांनी स्वरबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, नंदेश उमप आणि गायिका आर्या अंबेकर यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भाव-बहिणीच्या अनोख्या नात्यावर भाष्य करणारा ‘सिंड्रेला’ सिनेमा येत्या ४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.