महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन
‘क्लासमेट्स’ आणि ‘दगडी चाळ’मधून आपल्या अॅक्शनची झलक दाखवणार अंकुश येणाऱ्या नवीन वर्षी ‘गुरु’ या चित्रपटातून आपल्याला अॅक्शन पॅक्ड परफोर्मन्स देताना दिसून येणार आहे.’गुरु’मधील अंकुशच्या नव्या आणि हटके लूकची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
बॉलीवूडमध्ये अॅक्शन चित्रपटांचा ट्रेंड खूप आधीपासून चालत आला आहे आणि त्याच क्रेझप्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अॅक्शन हिरो म्हटलं की खिलाडी अक्षय कुमार, सनी देओल, सलमान खान यांसारखे आयकॉनिक हिरो डोळ्यासमोर येतात.मराठी प्रेक्षकांची आवड लक्षात घेता, यंग ब्रिगेडबरोबरच संपूर्ण कुटुंबांना मराठी चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी आता मराठीमध्येदेखील अॅक्शन चित्रपटांचा ट्रेंड रुजू होत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुरू’च्या टीझरमधून अंकुश जबरदस्त अॅक्शन सिन्स करताना दिसून येत आहे. महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता अंकुशने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे मग तो अभिनय विनोदी असो किंवा गंभीर. पण आता मात्र अंकुश आपल्या अॅक्शन पॅक्ड परफोर्मन्सने सर्वांना क्लीन बोल्ड करायच्या तयारीत आहे.अतिशय किचकट, कठीण आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारेअॅक्शन सिन्सपरफोर्म करण्यासाठी अंकुश आपल्या फिटनेस वरती खूप लक्ष देतो आहे आणि त्यासाठी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून त्याचा नेहमीचा व्यायाम, आहार आणि झोप यांच्या वेळा तो नियमितपणे पळतो.
अंकुशला अॅक्शन सीन्स आणि उत्कृष्ट स्टंट्स परफोर्म करताना पाहणे हा त्याच्या चाहत्यांसाठी एक सुखद अनुभव ठरेल. अंकुशच्या अभिनयाची तीव्रता त्याच्या अॅक्शन सीन्समधूनच नव्हे तर त्याच्या हावभाव आणि डोळ्यातही दिसून येते आणि त्याच्या याच अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉनलवकरच महाराष्ट्राचा फेवरेट अॅक्शन हिरो बनून सर्वांचे मन जिंकून घेईल यात शंकाच नाही.