अंकुशच्या हटके स्टाईलने तरुणाईला जिंकले
दुनिया गोल हे, जिंदगी झोल हे अस म्हणत प्रेक्षकांसमोर आलेला ‘गुरु’ सर्वाना काहीसा जास्तच भावला आहे. चमकदार गॉगल लावून ऐटीत वावरणाऱ्या गुरूची स्टाईल यंग ब्रिगेडमध्ये खूपच पॉप्यूलर झालेली दिसून येतेय.सलग ४ वेळा स्टाईल आयकॉन हे टायटल जिंकलेल्या अंकुशने याहीवेळी आपल्या हटके गुरु स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चमकदार गॉगल हे युथमध्ये गुरु स्टाईल स्टेटमेंटच बनले आहे. इतकच नव्हे तर सोशल मिडियावरदेखील गुरु स्टाईलच बोलबाला चालूच आहे. सोशल मिडियावर नेट कौलमध्ये आघाडीवर असलेला अंकुश आता त्याच्या गुरु अवतारमुळे चर्चेत आहे.हा गुरु स्टाईल फिवर सर्वांवर असा काही चढला आहे की, सोशल मिडियावर चालू असलेल्या गुरु ईश्टाईल कॉनटेस्टमध्ये आपले गुरु पोझमधील फोटो काढून अपलोड करण्यासाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.गुरु स्टाईल फॉलो करण्याची एकही संधी गुरु फॅन्स सोडत नाही आहेत. त्यांच्या या गुरु प्रेमामुळे सोशल मिडियावर पण ‘छा गये गुरु’ असे म्हणणे काही खोटे ठरणार नाही.