अमृता सुभाष-आर्चित देवधर पुन्हा आई-मुलाच्या भूमिकेत
‘किल्ला’ या चित्रपटात आई आणि मुलाचं हळवं नातं प्रभावीपणे आपल्या अभिनयातून व्यक्त केलेले अमृता सुभाष आणि आर्चित देवधर पुन्हा एकदा एकत्र आले आहे. अमृता सुभाष, आर्चित देवधर आणि सुनील बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘६ गुण’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
‘६ गुण’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून, या पोस्टरनं लक्ष वेधून घेतलं आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरलही लाँच करण्यात येणार आहे. या चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी त्यांची दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली आहे. उज्ज्वला गावडे यांनी निर्मिती केली असून, अशोक कोटियन आणि शीला राव सहनिर्माते आहेत. बऱ्याच महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला आहे.
या चित्रपटात आर्चित-अमृता पुन्हा एकत्र आले असल्यानं आणि सुनील बर्वेसारखा अभिनेता सोबत असल्यानं प्रेक्षकांना उत्तम अभिनयाची मेजवानी मिळणार आहे. पोस्टरमुळे ‘६ गुण’ विषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.