श्री साई समर्थ सेवेच्या चित्रकला स्पर्धेला अथांग प्रतिसाद!
लोअर परेल येथील श्री साई समर्थ सेवा या संस्थेने भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, वेध २०१६ या थीमखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मुंबईतील विविध विभागातून जवळपास दोन हजारहून अधिक मुलांचा सहभाग लाभला होता.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी ‘अथांग’ या चित्रपटातील अभिनेते मिलिंद गवळी व भूषण घाडी व मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे साहेब, आमदार सुनील शिंदे, बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, लो. अ. समितीचे चिटणीस महेश बोभाटे, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, शाखा प्रमुख दीपक बागवे, माजी आमदार गणपत कदम, समाजसेवक बाळाशेट कोपडे, इंटकचे अनिरुद्ध सावंत इ. पाहुणे उपस्थित होते.
अभिनेता मिलिंद गवळी यांच्या अगामी “एका मल्टी व्हेंचर्स प्रा. लि.,” निर्मित “अथांग” या चित्रपटा ची निर्मिती दिग्दर्शन व अभिनय अश्या तिहेरी भूमिकेत मिलिंद गवळी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीस आहे. त्याचा हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलताना मिलिंद म्हणाला कि मुले म्हणजे माझा विक पॉइन्ट आहेत. त्यामुळे चित्रकला स्पर्धेसाठी पाहुणा न येता त्यांचा मित्र म्हणून आज इथे उपस्थीत आहे. योगायोग म्हणजे माझ्या “अथांग”च्या नायिकेला पेंटीग्सची विशेष आवड असून तिने काढलेली सुंदर सुंदर पेंटीग पाहताना जसे प्रेक्षक हरऊन जाणार आहेत तसेच आज या मुलांनी काढलेली चित्रे पाहून मी हरऊन गेलो. मुलांनी चित्रांतून “वेध २०१६” हुबेहूब डोळ्यासमोर रेखाटून आम्हाला अचंबित केले. त्यांचे विचार खरच भविष्याचा वेध घेणारे आहेत.
तसाच काहीसा वेगळा माझा अथांग हा चित्रपट असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत तन्वी हेगडे, स्मिता शेवाळे, मिलिंद गवळी, अमित डोलावत, पूजा नायक, भूषण घाडी, मौसमी हडकर, शीतल गायकवाड, करिष्मा पाताडे(बाल कलाकार) तसेच पाहुणे कलाकार कन्नन अय्यर, प्रफुल सामंत, वंदना मराठे, रवी फलटणकर, सुझान बेर्नेट यांच्या भूमिका आहेत.
या चित्रकला स्पर्धेचे आयोजक राजा केरेकर, विजय मोरे, सचिन शिशुपाल यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या सोबत विकास जाधव, गणेश पालव, सुशांत मांजरेकर यांनी विशेष योगदान दिले होते.