धमाल कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा
यमुना फिल्म्स या बॅनरअंतर्गत निर्माते डॉ. यशवंत बाजीराव यांची निर्मिती असलेला ‘रंग माझा वेगळा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शनाबरोबरच गीत लेखन व संगीत दिग्दर्शन, चरित्र अभिनय अशा अनेक बाजूही डॉ. यशवंत बाजीराव यांनीच सांभाळल्या आहेत. डॉ. यशवंत बाजीराव यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून कुक्की चव्हाण यांनीसुद्धा बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात एकूण चार गाणी असून, उषा मंगेशकर, स्वप्निल बांदोडकर, धनश्री गणात्रा, प्रमिला जोग, पूनम गोडबोले यांनी ही गीते स्वरबद्ध केली आहेत.
‘रंग माझा वेगळा’ या चित्रपटात मोहन जोशी यांनी आपल्या दमदार अभिनयाने कमालीचा रंग भरलेला आहे. चेतन दळवी, प्रभाकर आंबोणे तसेच जॉनी लिव्हर (ज्युनि.) यांनी धमाल कॉमेडीच्या रंगाची उधळण केली असून, अनंत जोग यांनी उत्तम खलनायक साकारला आहे.
विक्रम पटेल आणि हेमांगिनी काज ही नवोदित जोडी या चित्रपटादद्वारे पदार्पण करत आहे. एकूणच आगळीवेगळी कहाणी, धमाल कॉमेडी, फॅमिली ड्रामा आणि उत्कृष्ट गीत—संगीत असलेला बहारदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.