१८ एप्रिलपर्यंत सुरु राहणार प्रदर्शन
जम्मूस्थित रंगलेखक राकेश कुमार यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे १२ एप्रिलपासून सुरु झाले असून ते १८ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
कलेच्या उगमाबद्दल चित्रकार राकेश कुमार म्हणतात “कलाकाराची कला उत्स्पुर्ततेमधून अवतरत असते. अशा कलाकृतीचा उगम बिंदू कोणताही असू शकतो. आकलनाच्या पातळीवर असलेली कलाकृती कॅनव्हासवर उतरते तेव्हाच ती प्रेक्षकांना पहायला मिळते असं असलं तरी कलाकाराला त्याची आधिच जाणीव झालेली असते. ही जाणीव झाल्यावर पुर्ततेला उतरणार्या चित्राचा विचार नकरता ते काढायला सुरुवात केली पाहिजे.”
चित्रकार राकेश कुमार यांनी जम्मू विद्यापीठ आणि जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून आपलं कलाशिक्षण पुर्ण केलं. आजपर्यंत अनेक एकल आणि समुह चित्रप्रदर्शनांमधून नावाजल्या गेलेल्या या चित्रकाराला अनेक पुरास्कार प्राप्त झाले आहेत. ललित कला अकादमी, दिल्ली, जे. ऍन्ड के कल्चरल अकादमी, तसंच कला केंद्र, जम्मू, आयआयआयएम श्रीनगर अशा सारख्या अनेक ठिकाणी त्यांची चित्र संग्रही ठेवण्यात आली आहेत.