कोलकातास्थित सुप्रसिद्ध रंगलेखक शामल मुखर्जी यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘लिरीकल स्माईल‘ हे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत १९ एप्रिलपासून सुरु झाले असून ते २५ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
रंगलेखक शामल मुखर्जी यांच्या कुंचल्यातून साकार होणारी रंगीन रंगछटांनी युक्त अशी लोक दृश्य आणि जीवन चित्रण असलेली चित्रं त्यांच्या मुळ राज्यात एक कौतुकाच्या विषय आहेत. के.जी. सुब्रमण्यम यांनी काचेवर विकसित केलेलं ‘रिव्हस्र पेंटींग’ हे दुर्मिळ तंत्र त्यानी आत्मसात केलं आहे.
१९६१ साली जन्मलेल्या चित्रकार शामल मुखर्जी यांनी महाविद्यालयीन काळ शांतीनिकेतन मधल्या रविंद्र भारती विद्यापीठात व्यतीत केला. तिथेच त्यानी फाएन आर्ट मधली पदवी आणि पदवीत्तर शिक्षण पुर्ण केलं. मुला माणसांचं निरिक्षण करीत बस आणि ट्रेनमधून प्रवास करणं हा त्यांचा छंदच होवून बसला आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रांमधलं प्रत्येक व्यक्तीचित्रं हे वेगळं आणि स्वत:ची कहाणी सांगणारं आहे. ही व्यक्तीमत्व काहीतरी काम करताना किंवा सादरीकरण करताना दिसतात. भगवा, लाल आणि हिरवा रंग वापरून या व्यक्तींचे पोशाख रंगवले आहेत. व्यंगचित्रात असतात तसे चेहरे असलेली ही चित्रं बोलकी आहेत. ही चित्रं पहाताक्षणी चेहर्यावर हास्य निर्माण करतात.
आजपर्यंत अनेक एकल आणि समूह चित्रप्रदर्शनात भाग घेतलेल्या चित्रकार शामल मुखर्जी यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कलाकृतींना कलारसिकांनीही भरभरून दाद दिली आहे.