‘युथ’ २०मे रोजी प्रदर्शित होणार
‘युथ’साठी अरमानने एक गाणे गायले असून, हे गाणे तरुणाईच्या ह्रदयाची तार छेडणार आहे. बदल घडवण्याची ताकद तरूणाईत निर्माण करणारा ‘युथ’ येत्या २०मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
जोश, उत्साह, वेगळेपण जपण्याचा अट्टाहास, बदल घडवण्याची इच्छा आणि त्यादिशेने उठणारी पाऊले या सगळ्याचे एकत्रित मिश्रण म्हणजे तारूण्य… याच तरूणाईचा चित्रपट म्हणजे‘युथ’… विक्टरी फिल्म्स प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित या चित्रपटाची सा-यांनाच उत्सुकता लागली आहे.
अरमान म्हणाला…’माझा जन्म मुंबईत झाला आहे, मी या मायभूमीचे देणं लागतो. मराठी ही आपली राजभाषा आहे, ती मला तितकीशी बोलता येत नाही पण या भाषेत गाण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.’
हल्ली सामाजिक विषयांवर बरेच सिनेमे प्रदर्शित होत आहेत.समाजाप्रति बांधिलकी म्हणून सिनेनिर्माते समाजाला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांवर प्रकाशझोत टाकताना दिसत आहेत.असाच एक प्रश्न म्हणजे पाणी टंचाई… हाच विषय मध्यवर्ती ठेवून विक्टरी फिल्म्स ‘युथ’ हा सिनेमा घेऊन येत आहे. ज्या चित्रपटात तरूणाईने मनात आणले तर बदल घडू शकतो असा आशय मांडण्यात आला आहे.
विशाल चव्हाण आणि युग यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून राकेश कुडाळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नेहा महाजन, अक्षय वाघमारे, अक्षय म्हात्रे, मीरा जोशी,शशांक जाधव, केतकी नारायण, या यंग ब्रिगेडबरोबर विक्रम गोखले आणि सतिश पुळेकर हे अनुभवी कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.