१७ जूनला प्रदर्शित होणार!
‘पिंडदान – A Mystical love story…..’ या आगामी मराठी चित्रपटाचं नाव इंग्लिश आणि मराठी आहे. याच नावात अव्यक्त ओढ, प्रेम आणि प्रेमातून येणारं अनादी अनंत काळाचं कनेक्शन देखिल आहे. हे कनेक्शन पिंडदानाशी कसं असेल ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी १७ जूनला प्रदर्शित होणारा ‘पिंडदान… ’ हा चित्रपट बघावा लागणार आहे.
सारथी एन्टरटेनमेंटच्या पूनम शेंडे यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाद्वारे फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेले बंटी प्रशांत या पदार्पण करत आहेत. प्रशांत पाटील यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि बंटी देशपांडे यांनी छायालेखन केलं आहे . चित्रपटाचं लेखन अग्निपथचे सह-संवाद लेखक अविनाश घोडके यांनी केलं आहे. वैभव जोशी आणि मंदार चोळकर यांचे गीतलेखन तर सागर धोटे हे संगीत दिग्दर्शक आहेत. दीपाली देशपांडे यांची वेशभूषा केली.
खऱ्या प्रेमाला कोणतही बंधन नसतं. ना भाषेचं, ना देशाचं, ना जातीचं, ना धर्माचं. जेव्हा या सगळ्या सीमा पार करून, दोन जीव एकमेकांच्या प्रेमाचा, एकमेकांचा स्वीकार करतात तेव्हा त्यांनी एकमेकांचे रितीरिवाज, भाषा, धर्म यांचाही मनोमन स्वीकार केलेला असतो. मग भलेही धर्मांतराचा सोपस्कार झालेला नसला तरीही ! अशाच एका सातासमुद्रापार भेटलेल्या आणि प्रेमात पडलेल्या दोन जीवांची गोष्ट म्हणजे, ‘उदय पिक्चर्स’च्या अश्तिका इरा एलएलपी निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘पिंडदान… !’ पण सगळ्या सीमा पार करून घडलेली प्रेम कथा आणि पिंडदान या दोन गोष्टीचं कनेक्शन काय असू शकेल ? याची उत्सुकता वाढलीये.
खऱ्या शास्त्राप्रमाणे पिंडदान कोणीही करू शकतं, फक्त ती पिंडदान करणारी व्यक्ती, ही मृत व्यक्तीशी मनाने जोडलेली असावी ! त्यांच्यात नातं कोणतही असू देत पण त्यांच्यातील प्रेम निस्वार्थी असावं. अश्या निस्वार्थी भावनेनं केलेलं पिंडदान लागू होतं. यातील दानाने दातृत्त्व मोठं होतं ! या उदात्त विचाराने प्रेरित झालेला हा चित्रपट.