एका ज्येष्ठ कलावंताला मानाचा मुजरा
स्टुडिओ ९ इंटरटेनमेंटचा ‘जलसा’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असून त्यात एका ज्येष्ठ कलावंताला मानाचा मुजरा करण्यात आला आहे.
मानसी नाईकचा या चित्रपटात नृत्याविष्कार बघायला मिळणार असून, आशुतोष राज हे ‘जलसा’चे दिग्दर्शक आहेत. ‘बाई, वाड्यावर या!’ या जगप्रसिद्ध डायलॉगचे गाण्यात शीर्षक-शब्द वापरून एक धमाल गाणे तयार झाले आहे. आनंद शिंदेंच्या भारदस्त आवाजाने गाण्याला चार चांद लागलेत. नृत्यदिग्दर्शक आहेत राजेश बिडवे. गाण्यात आशुतोष राज आणि निखिल वैरागर यांनी मानसी नाईकला साथ दिली आहे. हे गाणे हीट होईल, असा टीम ‘जलसा’चा दावा आहे.