या विषयी बोलताना निर्माते अंकुश सुतार म्हणाले, ‘आजवर बऱ्याच प्रेमकथा पडद्यावर आल्या आहेत. पण ‘तो आणि मी’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळीच कथा पाहायला मिळेल. प्रेम आणि त्याच्या विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास करून त्यांची सांगड ‘तो आणि मी’च्या कथानकाशी घालण्यात आली आहे. प्रेमाच्या रंगासोबत या चित्रपटातील जीवनातील विविध रंगही आहेत. गीत-संगीताची बाजूही प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. आजवर कधीही मराठी चित्रपटात न दिसलेल्या लोकेशन्सवर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. समाजाला काहीतरी सांगणारी कथा मांडताना प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन होईल याची पूर्ण खबरदारी ‘तोआणि मी’ बनवताना घेण्यात आली आहे, त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या दर्जाचा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. तंत्रज्ञांनी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला असल्याने ‘तो आणि मी’च्या रूपात फुल टू मनोरंजन करणारा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल याची खात्री आहे.’
‘तो आणि मी’ प्रदर्शनासाठी सज्ज
मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा अभिनय
निर्माते अंकुश विठ्ठल सुतार यांच्या यश क्रिएशन्सने ‘तो आणि मी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
स्मिता अंकुश सुतार सहनिर्मात्या असलेल्या या चित्रपटाचे दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि सकस कथानक बलस्थान असून मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल, असा विश्वास यश क्रिएशन्सला आहे.
दिग्दर्शक मुकेश मलिक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ही केवळ प्रेमकथा नसून आजवर कधीही समोर न आलेले पैलू या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.
सुनिल हरिश्चंद्र यांच्या साथीने मुकेश मलिक यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन केलं आहे. सुबोध भावे, गिरिजा जोशी, श्वेता शिंदे, प्रसाद ओक, प्रसाद पंडित, ज्योती म्हाळसे, माधव वझे, बालकलाकार दीप सुतार आदी कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.
संकलन छत्रपाल निनावे यांनी केलं असून असलम केयी यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. राजेश गमरे यांनी कोरिओग्राफी केली असून, तेच या चित्रपटाचे प्रॉडक्शन मेनेजर आहेत. गणेश डुबंरे कार्यकारी निर्माते असून, चैत्राली डोंगरे यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या कॉस्च्युम डिझायनिंगचे काम केलं आहे. अनिल चंडेल यांनी छायालेखन केलं असून, सादिक अली यांनी कलादिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.