नृत्याविष्कारांनी जिंकली उपस्थितांची मनं!
भारतीय संस्कृती आणि नृत्यशैलीला समर्पित ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’ने नृत्यक्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९६६पासून कार्यरत असलेल्या नालंदा संस्थेमार्फत साहित्य, कला, संगीत या क्षेत्रांत अमूल्य योगदान असणा-या दिग्गज कलावंतांना ‘भरतमुनी सम्मान’ पुरस्काराने गौरवण्यात येते.
यंदाच्या सुवर्ण महोत्सवी नालंदा नृत्योत्सवात आयोजित ‘भरतमुनी सम्मान सोहळ्या’मध्ये संगीत मार्तंड ज्येष्ठ शास्त्राrय गायक पंडित जसराज, ज्येष्ठ रंगकर्मी महेश एलकुंचवार आणि इम्फाळ येथील मणिपुरी नृत्यविशारद राजकुमार सिंगजीत सिंग यांना सन्मानित करण्यात आले.रविंद्र नाट्य मंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष ‘महाराष्ट्रभूषण’ डॉ. अनिल काकोडकर व अरविंद दलाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन या तीनही प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ‘मोहिनीअट्टम’ या कनक रेळे लिखित पुस्तकाची प्रतही भेट म्हणून देण्यात आली.
‘मोहिनीअट्टम’ या नृत्य प्रकाराला ख-या अर्थाने कनक रेळे यांनी ओळख मिळवून दिल्याचे मत यावेळी पंडित जसराज यांनी व्यक्त केले तर राजकुमार सिंगजीत सिंग यांनी ‘भरतमुनी’ या प्रसिध्द विद्याभ्यासू, सर्वज्ञानी व्यक्तिमत्त्वाच्या नावे मिळणा-या पुरस्काराने मला गौरविण्यात आल्याने माझा आनंद द्विगुणीत झाल्याचे सांगितले.१६ ते १९ जानेवारीदरम्यान रंगलेल्या नृत्योत्सवात ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’चा वेद-मंत्रांवर आणि भजनांवर आधारित ‘पृथ्वी आनंदिनी’ हा नवीन नृत्याविष्कार सादर केला गेला. देशभरातील विविध प्रांतातील कलाकारांनी भरतनाटयम्, कथ्थक, ओडीसी, मोहीनीअट्टम्, कुचीपूडी आदी भारतीय शास्त्रीय शास्त्रीय नृत्यशैलीतील आपल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली.