‘हलाल’मध्ये साकारली प्रमुख भूमिका
‘हलाल’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या प्रीतम कागणे हिने सह्याद्री सिने अवॉर्ड्स २०१६ या प्रतिष्ठित पुरास्कार सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन पटकावले आहे.
शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित चित्रपट ‘हलाल’ प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे ते म्हणजे या चित्रपटाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तसेच ५३व्या महाराष्ट्र स्टेट मराठी फिल्म अवॉर्ड्समध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळे. इतकेच नाही तर या चित्रपटाने कान्सवारीदेखील केली.
ऑडियोलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट हे प्रोफेशन असलेली प्रीतम अभिनयातदेखील निपुण आहे. बोकड या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटातील कारकिर्दीला सुरुवात केलेल्या प्रीतमने मराठी चित्रपटासोबतच हिंदी आणि मल्याळी सिनेमातदेखील काम केले आहे, तसेच ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ हे मराठी नाटकसुद्धा तिने केले आहे.
‘हलाल’ चित्रपटातील तिचा अभिनय दमदार असणार यात शंकाच नाही त्यामुळे सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रींच्या नामांकनासाठी योग्य असलेल्या प्रीतमला प्रेक्षकदेखील मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असतील.