स्वामी विवेकानंद हायस्कूलतर्फे सामूहिक देशभक्तीगीत स्पर्धा
विवेकानंद एज्युकेशन सोसायटीशी (व्हीईएस) संलग्न असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूल या चेंबूरमधील हायस्कूलच्या ‘विवेकिनी’ या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाने, १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी ‘जागृती-२०१६’ या सामूहिक देशभक्ती गीतांच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे यंदाचे २५वे वर्ष असून, त्यासाठी किंडरगार्टन ते महाविद्यालय स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागाचा आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, या स्पर्धेला अन्य शैक्षणिक संस्थांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘देशभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वामी विवेकानंदच्या राष्ट्रीयत्वाच्या मूल्यांचा प्रसार करण्यसाठी विवेकानंद एज्युकेशन स्कूल भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करत आले आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपले रक्त सांडणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यासाठी सध्याच्या पिढीला एका व्यासपीठावर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या शक्य असेल त्या पद्धतीने देशाची सेवा करण्याचाही हा एक मार्ग आहे,’ असे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश तेजवानी यांनी सांगितले.
स्पर्धेचे आयोजन तीन गटांमध्ये केले आहे. पहिल्या गटात किंडरगार्टन ते चौथ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. दुसऱ्या गटात पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतील आणि तिसऱ्या गटात ज्युनिअर कॉलेज व त्यावरील विद्यार्थी सहभागी होतील. सहभागींचे नियोजन संघांमध्ये केले जाईल आणि त्यांना देशभक्ती व राष्ट्रीय एकता यावरील, चित्रपटातील असलेली व नसलेली गाणी सादर करता येतील.