२३ ऑगस्टला शिवाजी मंदिरमध्ये विविध कार्यक्रम
ख्यातनाम नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचा प्रथम स्मृतिदिन, मंगळवार, दि. २३ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री ८.०० वा. शिवाजी मंदिर, दादर येथे साजरा होत आहे. या निमित्ताने प्र. ल. यांच्या नाट्य- एकांकिकांचे प्रवेश, कथा अभिवाचन आणि त्यांचे व्यक्तिमत्व उलगडणारा, ‘प्रतिभेचे अग्निपंख- प्र. ल.’ हा कार्यक्रम मान्यवर कलाकार सादर करतील.
या प्रसंगी समर्थ रंगभूमी रत्नागिरी निर्मित , ‘प्र. ल.’ या माहितीपटाचे प्रकाशन, नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ समीक्षक जयंत पवार आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
‘प्रतिभेचे अग्निपंख-प्र. ल.’ या कार्यक्रमात अरुण नलावडे, अविनाश आणि ऐश्वर्या नारकर, अतुल तोडणकर, शीतल शुक्ल, शर्वाणी पिल्ले, माधवी जुवेकर, सुभाष लोखंडे आणि ‘बेस्ट’च्या गुणी कलाकारांचा सहभाग असेल.
मान्यवर कलाकार, समीक्षक आणि रंगकर्मींच्या उपस्थितित होणार्या या कार्यक्रमाला, प्र. ल. प्रेमी आणि नाट्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन, सुप्रसिद्ध अभिनेते, प्र. ल. मित्र परिवाराचे तसेच रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे आणि निमंत्रक अविनाश नारकर यांनी केले आहे.