ठाकुर महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम
मुंबईच्या कांदिवली स्थित ठाकुर महाविद्यालयाने फिल्म, टेलीव्हिजन अँण्ड न्यू मिडिया प्रोडक्शन हा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात मुलांना लेखन, दृक्श्राव्य माध्यमातून कथेची मांडणी, संहिता लेखन, पटकथा लेखन, संकलन, प्रोडक्शन, दिग्दर्शन, छायाचित्रण अशा वेगवेगळ्या विषयांची प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे.
या अभ्यासक्रमात मुलांना सिनेमा कसा तयार करतात व तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया काय असते याचं प्रशिक्षण दिलं जाईल. बँचलर ऑफ आर्टस इन फिल्म, टेलिव्हिजन, अँण्ड न्यु मिडिया प्रोडक्शन असं या अभ्यासक्रमाच नाव आहे. या तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ओंकार पाटकर- ९८३३५९७५९८
(विभाग समन्वयक, ठाकूर महाविद्यालय)