जिंका एक लाखाचा प्रथम पुरस्कार!
नाटय क्षेत्रातील ख्यातनाम मेटा फेस्टीव्हल २१ मार्च ते २६ मार्चदरम्यान दिल्लीमध्ये होणार असून, या पुरस्कारामध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण भारतातून नाट्य क्षेत्रात काम करणा-याना या पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी आवाहन केले आहे.
महिंद्रा एक्सेलेन्स इन थिएटर अवार्ड्स (meta) हा आठवडाभराचा नाटय महोत्सव व पुरस्कार जो वर्षभरातील सर्वोत्तम उत्तम नाटकला देण्यात येतो.दरवर्षी मेटा पुरस्कार नाट्य क्षेत्रातील विविध १३ विभागामध्ये दिला जातो. या पुरस्काराचे वैशिष्टय म्हणजे हा पुरस्कार फक्त सर्वोत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यांच्या व्यतिरिक्त स्टेज डिझाईन, लाईटींग आणि कॉस्ट्यूमसारख्या नाटकातील विविध विभागाला दिला जातो. भारतातील अनेक थिएटर ग्रुप्स या फेस्टीवलमध्ये भाग घेतात. पुरस्कार वितरण समारंभ २७ मार्च रोजी दिल्लीमध्ये होणार आहे.
या पुरस्काराची सुरुवात महिंद्रा ग्रुपने नाट्यकलेला उत्तेजन व वाव मिळण्यासाठी केली आहे. नाट्यसृष्टीला एकत्र आणणे, या उद्देशाने मेटा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप एक स्पेशल डिझाइन ट्रॉफी आणि रु.१,००,००० चा धनादेश निर्मितीसाठी, रु ७५,०००/- सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनासाठी, रु. ४५,०००/- इतर भागांसाठी असे असणार आहे.मेटाने या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविल्या आहेत. नाटकच्या प्रती डीव्हीडीच्या स्वरुपात ३० जानेवारी रोजी किंवा त्या अगोदर सादर करायच्या आहेत.
जे प्रोडक्शन पात्रता पूर्ण करतील त्यांची नाटके निवड समितीतील ५ ख्यातनामक नाटयकर्मी पाहतील. निवड समिती यातील १० उत्कृष्ट प्रोडक्शनची निवड या आलेल्या सर्व डीव्हीडीमधून करतील. १० निवडलेल्या पोडक्शनना ज्यूरी व प्रेक्षकांसमोर त्यांच्या प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर करावा लागेल. प्रत्येक प्रवेशिकेला मेटाच्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील.
“महिंद्र ग्रुपला भारतीय नाटकाच्या वेगवेगळया प्रकाराला मेटाद्वारे एक रंगमंच उपलब्ध करून द्यायचा आहे. मेटाचा एकच उद्देश्य आहे कि नाटयक्षेत्राला योग्य ती जनजागृती व योग्य तो मान सम्मान प्राप्त करून दयायचा आहे. मेटा पुरस्कार हा भारतीय नाटयक्षेत्रासाठी एक मानाचे स्थान मिळवून देईल. या पुरस्काराचे वैशिष्टय म्हणजे हा पुरस्कार फक्त बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट डायरेक्टर यांच्या व्यतिरिक्त स्टेज डिझाईन, लाईटींग आणि कॉस्ट्यूमसारख्या नाटकाच्या विविध विभागाला दिला जातो.”
–जय शहा, हेड, कल्चरल आऊट रिच, महिंद्रा ग्रुप
अधिक माहितीसाठी संपर्क: ९८१९१३१९४०