चित्रपट लवकरच येणार!
गेले काही दिवस सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होणाऱ्या ‘अ डॉट कॉम मॉम’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून, साधीभोळी आई अमेरिकेत जाऊन काय काय प्रताप करते याचा अंदाज पोस्टरवरून येतो.
सोशल नेटवर्किंग साईट्समुळे आपआपसांतील नेटवर्क खूप स्ट्राँग झाले आहे. उत्तम पध्दतीने, थोड्या वेळात हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत ‘अ डॉट कॉम मॉम’चे पोस्टरही डिजीटली लाँच केले आहे. .
अमेरिकेत चित्रीत झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट ज्यात सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी नाटके आपल्यासमोर आणणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेत आहेत.
या चित्रपटात त्यांनी मॉमची भूमिका साकारली असून त्यांच्या मुलाच्या भूमिकेत मराठमोळा सर्वायव्हर साई गुंडेवार आहे. तर विक्रम गोखले बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या ‘अ डॉट कॉम मॉम’च्या सुनेची भूमिका साकारली आहे अमेरिकन कलाकार अपूर्वा भालेराव हिने… ‘अ डॉट कॉम मॉम’च्या पोस्टरवरूनच आपल्याला हसवणाऱ्या या मॉमचे प्रताप पाहण्यासाठी ‘अ डॉट कॉम मॉम’ सिनेरसिकांना खुणावणार आहे..