‘मिस्टर…’ झाले राजेंद्र शिसतकर!
‘पप्पी दे पारूला’फेम स्मिता गोंदकर आणि क्राईम पेट्रोल मालिकेतून घराघरात ओळखीचा झालेला चेहरा म्हणजेच राजेंद्र शिसतकर ही फ्रेश जोडी ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येत आहे.
मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेडच्या निमित्ताने एकमेकांना अनवॉन्टेड झालेल्या या जोडीतील मिस्टर अनवॉन्टेड राजेंद्र शिसतकर पहिल्यांदाच एका रोमँटिक भूमिकेत दिसणार आहेत. मिसेस अनवॉन्टेड… अवघ्या महाराष्ट्राची कांताबाई… स्मिता गोंदकर तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस भूमिकांपासून वेगळी भूमिका करत आहे. स्मिता गोंदकरचा आजवर न पाहिलेला अंदाज मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेच्या निमित्ताने सिनेरसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अशी ही अनोखी जोडी असणाऱ्या मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी केले असून, चित्रपटाची कथा प्रकाश गावडे यांची आहे.
उर्वी एंटरप्रायजेस निर्मित मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटाचे निर्माते मितांग भूपेंद्र रावल आहेत. अनोख्या विषयाबरोबरच एक हटके जोडी आपल्यासमोर आणणारा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.