आदिरंग महोत्सवात सांस्कृतिक मंत्र्यांचं आश्वासन
मुंबईत आंतरराष्ट्रीय ख्यातीच महाराष्ट्र इंटरनॅशनल स्कुल आॅफ ड्रामासाठी तुम्ही प्रस्ताव द्या, प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ हालचाली करत त्यासाठी जे जे काही लागेल ते शासन द्यायला तयार आहे, असं आश्वासन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिलं.
नॅशनल स्कुल आॅफ ड्रामा आणि पु ल देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आदिरंग महोत्सवाचं २९ डिसेंबरला उद्घाटन करण्यात आलं. यावेळी तावडे बोलत होते,
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, राजस्थानी कवीं डॉ. अर्जुन देवचरणसिंग आदी मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.
आदिवासी लोकांच्या मूळ प्रवाहाशी शहराची नाळ जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं जर झालं तर शहरात येऊन आपली प्राचीन संस्कृतीपासून भटकलेल्या शहरवासीयांना आपली संस्कृती अनुभवता येईल, असे सांस्कृतिक मंत्री विनोद तावड़े यांनी सांगितले.
ज्या विकासाच्या गोष्टी आपण करतो तो विकास आदिवासींसाठी विस्थापन आहे. आदिरंगसारख्या कार्यक्रमांमधून आपण यांना मुख्य प्रवाहात आणतो, असं म्हणत राजस्थानी कवी, डॉ. अर्जुन देवचरण यांनी नॅशनल स्कुल ऑफ़ ड्रामा यांच अभिनंदन केलं.
भारतभरातून आलेल्या ७०० पेक्षा जास्त आदिवासी कलाकारांनी आपापल्या नृत्याची झलक दाखवत या रंगीत कार्यक्रमच्या उद्घटनाचा कार्यक्रम पार पडला. शुक्रवार (३० डिसेंबर)पासून ३१ डिसेंबरपर्यंत विविध कलाविष्कार या महोत्सवात सादर होणार आहेत.