अक्षरने भेट दिली खोपलीमधील आदिवासी पाड्याला!
कलर्स मराठीवरील ‘चाहूल’ मालिकेतील सर्जेराव म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी याने आपल्या व्यस्ततेतून वेळ काढला आणि थेट लोणावळ्याला गेलाला. तिथे जात असताना त्यांनी खूप सुंदर फोटोजदेखील काढले.
खोपोलीमधील आदिवासी पाड्यातील आदिवासींना भेटला, त्यांच्या बरोबर जेवला. अक्षरला ते कमला आणि चाहूल या मालिकांमुळे ओळखत असून, त्यांनी त्याच्याबरोबर फोटोज काढले. त्यांना आपल्या आवडत्या कलाकाराला बघून खूपच आनंद झाला.
अक्षर म्हणाला, ‘सध्या मी बऱ्याच कामांमध्ये व्यस्त आहे त्यामुळे मला स्वत:साठी वेळ काढणे जमत नाही. पण त्यादिवशी packup लवकर झाले त्यामुळे मी लगेच निर्णय घेतला आणि बाहेर पडलो. मला मध्यंतरी स्लीप डिस्कचा त्रास झाला होता त्यामुळे मी गाडी चालवू शकत नव्हतो. पण, आता तो त्रास बराच कमी झाला आहे त्यामुळे मी एकटाच मस्त ड्राइव्ह करत गेलो. खूप मज्जा आली, पण मी मानसीला नक्कीच मिस केलं.