१५ ते २० मेदरम्यान सर्वोत्तम सहा चित्रपट
महाराष्ट्रातील प्रत्येक सिनेरसिकाला आपलीशी वाटणारी बहीण, सून, वहिनी अशा विविधांगी भूमिकांनी ‘अलका कुबल’ हे नाव घराघरांत पोहोचले आहे. या गुणवंत अभिनेत्रीला सलाम करीत त्यांचे काही निवडक चित्रपट ‘अलका कुबल स्पेशल’मध्ये रसिकांना पहायला मिळतील.
सोमवार १५ मे ते शनिवार २० मेदरम्यान सकाळी ११.३० वा. ‘बंडलबाज’, ‘नशीबवान’, ‘सविताबानो’, ‘गृहलक्ष्मी’, ‘लगीन माझ्या खंडोबाचं’, ‘मोहिनी’ यांसारख्या चित्रपटांचा नजराणा ‘फक्त मराठी’ वाहिनी आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत.
असंख्य चित्रपटांतून सोशिक तरीही आत्मविश्वासू व कणखर व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘अलका कुबल’ यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून स्वत:चा एक मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. फक्त मराठी वाहिनीवर सोमवार १५ मे ते शनिवार २० मे सकाळी ११.३० वा. दाखवण्यात येणारा ‘अलका कुबल स्पेशल’ प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि आपल्या अभिनय कौशल्यातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या कलावंतांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्याची अनोखी संकल्पना ‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनीने मांडली आहे.