सुमारे ५०० कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
ज्या कलाकारांना पैश्याअभावी मोठमोठ्या प्रदर्शनात सहभागी होता येत नाही आणि ज्यांना या प्रदर्शनातील मोठ्या किमतीची चित्रे, शिल्पे विकत घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी ‘द अॅप्रिशिएबल आर्ट फेअर – द नो कमिशन शो’ वरळीतील एका कलादालनात सुरु झाला आहे .

संस्थापक रवींद्र मार्दिया यांनी प्रदर्शनाविषयी असे सांगितले की, ‘यामुळे सर्वांनाच संधी उपलब्ध होणार आहे. खरेदी करताना एक सुंदर चित्र अथवा शिल्प कमी किंमतीत विकत घेता येईल. यामुळे आपल्याकडील संग्रहात वाढ होईलच आणि इच्छुक असणाऱ्यांच्या संग्रहालादेखील सुरुवात होईल. नो कमिशन या कल्पनेमुळे कमी किंमतीत कलाकारानाही आपली कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल. यासाठी ICAC द्वारे निवडप्रक्रियादेखील करण्यात आली’.
या प्रदर्शनात १०० स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकार सामील झाले आहेत. जवळ– जवळ ५०० कलाकृती इथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. याचबरोबर विषयासंदर्भात कार्यशाळा, चर्चा, शैक्षणिक कार्यक्रम इत्यादीचे आयोजन केले आहे.

मुंबईस्थित आय.सी.ए.सी. ही सामाजिक संस्था लोकांना देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कलाकारांच्या कलांची ओळख पटवून देण्याचा याद्वारे प्रयत्न करीत आहे. आय.सी.ए.सी. चा एकमेव उद्देश हाच आहे की उच्च प्रतीचा कलाविष्कार लोकांसमोर आणणे हा आहे आणि त्यासाठी ही संस्था सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तसेच त्यामुळे नवीन कलाकारांना त्यांची कला जोपासण्यासाठी एक नवीन रंगमंच तयार झाला आहे.
प्रदर्शन तारीख – १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर
वेळ – सकाळी ११ ते रात्री ९
स्थळ – द आर्ट हब, अट्रीया मॉल, ३ रा मजला, पूनम चेंबर्स समोर, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई – ४०००१८
संपर्क क्र. – (०२२ ) ६६२५१३३३ / ९८२०१५१४१५ / ९१६७८५११७९
वेबसाईट – www.icacart.com