२५ आणि २६ मार्च आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषद
भारतात प्राचीन काळापासून रुजलेल्या बौध्द परंपरेचा जागर करण्यासाठी अखिल भारतीय भिक्कू संघातर्फे २५ आणि २६ मार्च २०१७ असे दोन दिवस आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषदेचे आयोजन लोणावळा येथे केले आहे.
आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषदेमध्ये चित्रे, छायाचित्र प्रदर्शन, संगीत आणि प्रसिध्द कलाकार आणि विद्यार्थी समूहाने सादर केलेल्या परफॉर्मिंग आर्टसचा समावेश दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आणि पर्यटन महोत्सवाचा समावेश असेल.
लोणावळ्यातील कार्ले, भाजे आणि बेडसे या ऐतिहासिक लेण्यांच्या सान्निध्यात ही परिषद होणार असून अखिल भारतीय भिक्कू संघाच्या मुंबई शाखेने त्याचे आयोजन केले आहे. या परिषदेत भारतभरातून बौध्द अध्यापक, शेकडो आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि सन्माननीय सदस्य सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाविषयी भिक्कू संघाच्या युनायटेड बुध्दिस्ट मिशनचे अध्यक्ष डॉ. वेन. भदंत राहुल बोधी महा थेरो म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषदेचे आयोजन करण्यामागे आमचा मुख्य हेतू लोकांना धम्म दैनंदिन जीवनात कसा आचरता येईल याविषयी जागृती करण्याचा आहे. बुध्दाची शिकवण समजून, उमजून या आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ जगात कशी अंगिकारता येईल हे समजावणे आमचे मिशन आहे.’
या परिषदेचा एक उद्देश जगातील विविध भागांतील बौध्दांमध्ये मैत्री घडविण्याबरोबरच त्यांचा विविध उपक्रमांच्या माध्यमातून बौध्द कार्यकर्ते आणि अभ्यासकांमध्ये संवाद घडवून धम्म जगण्याचा भाग कसा करायचा याविषयी मार्गदर्शन मिळविणे आहे.
बौध्द धम्म महाअधिवेशनाचा एक भाग म्हणून स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित भित्तीपत्रक आणि फलक कार्यक्रमस्थळी लावण्यात येणार आहेत.
सहभाग घेण्यासाठी लॉग इन करा www.buddhaadhiveshan.com
किंवा adhiveshan2017@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधा.