आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा अभिनेता संग्राम समेळचा नायकाची भूमिका असलेला पहिलावहिला चित्रपट ‘ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची’ येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
‘निखिल फिल्म्स’प्रस्तुत ‘ब्रेव्हहार्ट’ या चित्रपटातही माणुसकीचे दर्शन घडत वडिल मुलाच्या नात्याचे अनोखे बंध उलगडणार आहेत. आपल्या या पहिल्या चित्रपटासाठी संग्राम उत्सुक असून, नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी म्हत्त्वाचं असल्याचं’ संग्रामने या निमित्ताने सांगितलं. ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपट प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन अवश्य पाहवा’, असं सांगत संग्रामने नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.