‘वर्ल्ड फेमस इन महाराष्ट्र’ व्हिडीओ सिरीज
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध काही गोष्टींची व्हिडीओ सिरीज तयार करण्यात आली असून ती ‘कॅफेमराठी’वर ‘वर्ल्ड फेमस इन महाराष्ट्र’ नावाने बघता येणार आहे.
ही व्हिडीओ सिरीज महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल अशा सर्व गोष्टीसाठी तयार करण्यात आली आहे. या सिरीजसाठी प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी आपला आवाज दिला आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रातील वैभव संपन्नता आणि जगप्रसिद्ध गोष्टी डिजीटल प्लॅटफॉर्मवर आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीने सादर व्हाव्या या हेतूने याची निर्मिती करण्यात आल्याचे कॅफेमराठीचे निर्माते भूपेन्द्रकुमार नंदन आणि निखील रायबोले यांनी सांगितले आहे.
कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही अशा आपल्या महाराष्ट्रातील काही गोष्टी जगप्रसिद्ध असतात. त्या सर्वांचा समावेश या सिरीज मध्ये करण्यात आला आहे. आम्हाला खात्री आहे कि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचे व्हिडीओ नक्कीच आवडतील. यापेक्षाही अजूनही काही मजेशीर गोष्टी असल्यास आमच्याशी तुम्ही शेअर करू शकतात असेही आवाहन टीम कॅफेमराठीकडून करण्यात आले आहे.
सदर व्हिडीओ सिरीज तुम्हाला कॅफेमराठी मोबाईल अॅप आणि कॅफेमराठी युट्यूब चॅनलवर मोफत पहायला मिळणार आहे.