तीन कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
सत्यजित वरेकर, संताजी चौगुले आणि तृप्ती दहिबावकर या सुप्रसिद्ध कलाकारांचे ‘फॉल्क गॅलोर २’ हे समूह चित्रप्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात आलं असून ते १७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील.
सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर कलेचे संस्कार करणारे तरुण चित्रकार प्रा. सत्यजित वरेकर हे ग्रामिण जीवनाचं यथार्थ चित्रण करणारे कलाकार असून वास्तवचित्रकलेकडे त्यांचा ओढा राहिला आहे. नंदीबैल आणि त्याला घेऊन फिरणारे लोककलाकार यांनी परिधान केलेले रंगीबेरंगी कपडे, नंदीच्या गळ्यात असलेल्या घंटा, कलाकुसरीच्या वस्तू, घुंगरु या सर्वांचा पगडा त्यांच्या बालमनावर बसला होता. त्याच बालपणीच्या आठवणीतला नंदी हा त्यांच्या प्रस्तूत प्रदर्शनाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नंदीला पुजलं जातं तसंच त्याला भगवान शिवाचं वाहन म्हणून मान दिला जातो. हाच मनात घर करून बसलेला नंदी वारेकर यांनी गेलं एक तप कॅनवासवर विविध स्वरूपात साकार केला आहे. नंदी आणि त्याच्या मालकाचं हुबेहुब दर्शन आणि डोळ्यातले भाव पहात राहण्यासारखे आहेत. त्या दोहोंबधला भावबंध, जिवाभावाचं नातं आणि परस्पर विश्वास या चित्रांमधून अत्यंत समर्पकपणे रेखाटला गेला आहे. ‘प्रेम हेच जीवन आणि जगण्यासाठीच प्रेम’ हा संदेश या प्रदर्शनातून दिला गेला आहे.
चित्रकार सत्यजित वरेकर यानी तैलरंग, एक्रिलिक, चारकोल, ऑईल पेस्टल्स, जल रंग अशा अनेक रंगांचा सुयोग्य वापर करून ही चित्रं साकार केली आहेत. आजपर्यंत अनेक समूह आणि एकल कला प्रदर्शनांमधून त्यांनी आपल्या चित्रकृती मांडल्या असून त्या कलारसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अनेक राष्ट्रीय कलासंस्था आणि राज्य सरकारकडून त्यांच्या चित्रांना पुरस्कार प्राप्त झाले असून देश विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, संग्राहक आणि संस्थांच्या दालनांमध्ये त्याच्या चित्रकृती विराजमान झाल्या आहेत.
चित्रकार सत्यजित वरेकर यानी तैलरंग, एक्रिलिक, चारकोल, ऑईल पेस्टल्स, जल रंग अशा अनेक रंगांचा सुयोग्य वापर करून ही चित्रं साकार केली आहेत. आजपर्यंत अनेक समूह आणि एकल कला प्रदर्शनांमधून त्यांनी आपल्या चित्रकृती मांडल्या असून त्या कलारसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अनेक राष्ट्रीय कलासंस्था आणि राज्य सरकारकडून त्यांच्या चित्रांना पुरस्कार प्राप्त झाले असून देश विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, संग्राहक आणि संस्थांच्या दालनांमध्ये त्याच्या चित्रकृती विराजमान झाल्या आहेत.
संताजी चौगुले हे कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापूरचे प्रतिथयश शिल्पकार असून त्यानी अलिकडच्या काळात साकार केलेल्या ब्रॉन्झमधल्या शिल्पकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. कलामंदीर महाविद्यालय कोल्हापूर येथून कलेचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर संताजी चौगुले यानी दगड, लाकूड, ब्रॉन्झ, धातू अशा माध्यमांच्या सहाय्याने अनेक शिल्पं साकार केली आणि मुंबई, पुणे, नागपूर या शहरात अनेक एकल तसंच समूह प्रदर्शनांच्या माध्यमातून ती रसिकांसमोर मांडली. रसिकांच्या पसंतीस उतरलेली त्यांची शिल्पं उत्तरोत्तर वाखाणली जावू लागली.
सदर प्रदर्शशनात संताजी चौगुले यांनी ब्रॉन्झ आणि दगडात साकार केलेल्या नाचर्या मोराच्या अनेक भाव दर्शवणार्या अप्रतीम कलाकृती सादर केल्या आहेत. मोराचा नाच, त्याची अदाकारी आणि लकब याचं यथायोग्य दर्शन या शिल्पकृतींमधून घडतं.
तृप्ती दहिबावकर यानीसुद्धा वैविध्यपुर्ण माध्यमांचा वापर करून साकार केलेली शिल्पं या प्रदर्शनात मांडली आहेत. मानव आणि त्याचं सभोवतालच्या परिसराशी असलेलं घट्ट नातं त्यानी मांडलेल्या शिल्पांमधून अनुभवायला मिळतं. मानवाच्या भावनीक नात्यांचा बंध या शिल्पकृती प्रगट करतात.